श्री राम नवमी शोभायात्रा उत्सव समिती तेल्हारा कार्यकारिणी गठीत.
तालुकाध्यक्ष विशाल ठाकरे (कोठा), तेल्हारा शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर ढेंगे(तेल्हारा) निवड.
श्री राम नवमी शोभायात्रा उत्सव समिती तेल्हारा कार्यकारिणी गठीत.
तालुकाध्यक्ष विशाल ठाकरे (कोठा), तेल्हारा शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर ढेंगे(तेल्हारा) निवड.

तेल्हारा दि.१२
तेल्हारा येथील श्री पुष्कर्णा मंदिरात दि.११ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता श्री राम नवमी शोभायात्रा उत्सव समिती ची सभा संपन्न होऊन कार्यकारिणी निवड करण्यात आली.
प्रारंभी छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दीप प्रज्वलन, हारार्पण करण्यात येऊन त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यात आले. श्री राम नवमी शोभायात्रा उत्सव समिती कार्यकारिणी गठन सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
नवगठीत पदाधिकाऱ्यांमध्ये तेल्हारा तालुकाध्यक्ष विशाल ठाकरे (कोठा), तेल्हारा शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर ढेंगे(तेल्हारा), उपाध्यक्ष अनिल अवचार, ओम देशमुख, ओम आवारे, सचिव गोपाल छांगाणी, कोषाध्यक्ष पुरुषोत्तम पाटील, प्रसिद्धी प्रमुख रवी शर्मा तर सदस्यांमध्ये सर्वश्री सुनील राठोड, प्रणव माहुरे,वैभव मानकर, विष्णू किशोर सपकाळ, रोहन पीवाल, ओम आमले, गोपाल शर्मा, साहिल परदेशी, विक्रम सारवान, सचिन गावत्रे, विजय मार्के, ऋतिक मानकर, मंगेश हागे, ऋषिकेश भाकरे यांचा समावेश आहे.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते सर्वश्री सचिन थाटे, गजानन गायकवाड, राहुल शृंगारकर यांनी उपस्थित रामभक्तांना मार्गदर्शन केले. नियोजन बैठकीला मोठ्या संख्येने राम भक्त व सनातन धर्म रक्षक कार्यकर्ते उपस्थित होते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, सत्य सनातन हिंदू धर्म की जय, गौ माता की जय, भारत माता की जय, धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, विश्व का कल्याण हो, प्राणियों में सद्भावना हो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र भगवान की जय, जय श्रीराम इत्यादी गगनभेदी घोषणांनी परिसर निनादला होता. सभेनंतर टॉवर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हारार्पण करण्यात येऊन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.