तेल्हारा काँग्रेसतर्फे दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध.
तेल्हारा काँग्रेसतर्फे दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध.
तेल्हारा काँग्रेसतर्फे दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील पोलिस कारवाईचा निषेध.

दिल्ली येथील जंतरमंतरवर नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ सुरू असलेल्या शांततामय आंदोलना दरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिस कारवाईच्या निषेधार्थ तेल्हारा तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
यावेळी संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांना न्याय मिळावा तसेच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा बाबत मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ आंदोलनात सहभागी झालेल्या लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईचाही निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला उपाध्यक्ष डॉ. संजीवनीताई बिहाडे, तालुकाध्यक्ष गजानन वानखडे, शहराध्यक्ष ॲड. संदीप देशमुख, डॉ. अशोकराव बिहाडे, प्रकाशराव वाकोडे, माजी पंचायत समिती सभापती अतुल ढोले, ॲड. राहाणे, रजिया ताई पटेल, संजय गिऱ्हे, धनंजय गावंडे, अनंत सोनमाळे, डॉ. डी. एन. राठी, मोहनराव अंजनकर, अमोल रोठे, नितीन वानखडे, श्यामजी बघणे, अन्सार पटेल, अनंत दही, फिरोज पठाण, शेख अक्रम, ॲड. सुमित कोठे, नरेश सुईवाल, निखिल देशमुख, रफिकभाई, पुरुषोत्तम मानकर, दीपक निकाडे, अमीरभाई, धनंजय मानकर यांच्यासह तेल्हारा काँग्रेसचे विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.