आपला जिल्हा

भगवान जगन्नाथाची रथयात्रा उत्सव ग्राम वाडी अदमपूर ईसापुर येथे मोठ्या उत्साहात साजरी.

पंचक्रोशीतील भाविक भक्तासह अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांची विशेष उपस्थिती.

भगवान जगन्नाथाची रथयात्रा उत्सव ग्राम वाडी अदमपूर ईसापुर येथे मोठ्या उत्साहात साजरी.
पंचक्रोशीतील भाविक भक्तासह
अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांची विशेष उपस्थिती.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील ग्राम वाडी अदमपूर ईसापुर येथे दरवर्षीप्रमाणे शुक्रवार 27 जून 2025 रोजी भगवान जगन्नाथ रथयात्रा उत्सव वाडी अदमपूर ईसापुर येथे मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आली. अकोट मतदारसंघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे यांची विशेष उपस्थिती होती.

पंचक्रोशीतील जनसमुदाय भाविकांचे श्रद्धास्थान भगवान जगन्नाथ रथयात्रा उत्सवा मध्ये भगवान जगन्नाथ, भगवान बलभद्रजी, सुभद्रामाता या ईसापुर येथील मंदिरातून रथयात्रेतून वाडी अदमपूर येथील त्यांच्या मावशीच्या येथे गुंडीच्या माता मंदिरा मध्ये दिनांक 4 जुलै शुक्रवार पर्यंत वाडी अदमपूर येथे मुक्कामी राहतात. दिनांक 5 जुलै शनिवार रोजी ते पुन्हा इसापूर येथील मुख्य भगवान जगन्नाथ या मंदिरात परत येतील असे या रथयात्रेचे महत्त्व असून ही रथयात्रा ईसापुर ते वाडी अदमपूर या दोन गावातील भाविक भक्तांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात रथयात्रा काढली जाते. 

रथयात्रेला संपूर्ण पंचकोशीतील भाविक भक्तांची उपस्थिती लाभली होती. प्रत्येक गावातील भाविक भक्त,महिला मंडळ, बालगोपाल, वारकरी संप्रदायाची भजनी मंडळ रथ ओढण्या साठी भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेत उपस्थित होवून सहभागी होताना दिसतात. या भगवान जगन्नाथाच्या रथ यात्रेत दोन्ही गावांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. रथयात्रे दरम्यान ठीक ठिकाणी नींबू शरबत, चहापाण्याचे आयोजन सुद्धा दोन्ही गावांमध्ये गावकरी स्वयंस्फूर्तीने व उत्साहात करतात.


या रथयात्रेला अकोट मतदार संघाचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे उपस्थित राहून भाविक भक्तांसोबत भगवान जगन्नाथ रथयात्रेत सहभागी झाले होते त्यांचे हस्ते रथाचे पूजन करण्यात आले. यावेळी वाडी अदमपूर चे सरपंच रुपेश वल्लभदास राठी, एकनाथराव रेलकर, उपसरपंच विठ्ठल खारोडे, ग्रामपंचायत सदस्य जितेंद्र जाधव, मंगेश पाटील वाघ, भारतीय जनता पार्टीचे नेते उमेश पवार, तेल्हारा शहर अध्यक्ष ओमु सुईवाल, संजय तीवाने, अमृता पाटील राऊत, जयंतराव बोडके, धनु पाटील वाघ, मनोहर जती, दिगंबर धोटे, विठ्ठलराव भाकरे, अनिल तिवाने, राजेश पाटील वाघ, रामकृष्ण तीवाने,अनंता तळोकार, अंकुश पाटील वाघ, भगत पाटील वाघ, उमेश नागे, गणेश घाटोळ, मुरलीधर वारूळकर, डॉ अमृतलाल मंत्री, विजू पाटील वारुळकर, अनंतराव तळोकार, महादेवराव नागे, खंडोजी घाटोड, विलासराव खारोडे, विठ्ठल चितोडे, शालिग्राम जती, अक्षय तिव्हाने,प्रशांत हिंगणे, शैलेश तिव्हाने, श्याम मूर्तीजापुरकर, संजय राठी, अनिल खारोडे, गोपाल भाकरे, भास्कर चितोडे, हरिभाऊ तिव्हाणे, दिलीप भोंगळ, निलेश खारोडे, राहुल घाटोड, जेटमल मंत्री, बाळू भाऊ वाघ, पांडुरंग तीवाने ,योगेश भाकरे सह पंचक्रोशीतील व तिन्ही गावाचे भावीक भक्त महिला मंडळीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. रथयात्रा उत्सव तिन्ही गावातील संपूर्ण जाती समाज बांधव, गावकऱ्यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!