सेठ बन्सीधर विद्यालय शताब्दी महोत्सव शिक्षक आमदार किरण सरनाईक यांची भेट.
शिवराजे जामोदे सर यांचा सत्कार.
सेठ बन्सीधर विद्यालय शताब्दी महोत्सव
शिक्षक आमदार किरण सरनाईक यांची भेट.
शिवराजे जामोदे सर यांचा सत्कार.

सेठ बन्सीधर विद्यालय शताब्दी महोत्सवात शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या हस्ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध निसर्ग कवी शिवराजे जामोदे यांचा सत्कार करण्यात आला.
तेल्हारा येथील सेठ बन्सीधर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवात शिक्षक आमदार किरण सरनाईक यांनी भेट देवून आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी राहिले. संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल, उपाध्यक्ष राजेंद्र शहा,विठ्ठलराव खारोडे, विलास जोशी, ऐतिहासिक नाणे संग्रहक देशमुख सर, ओमप्रकाश झुनझुनवाला, शहा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
शिवराजे जामोदे हे आरसूड येथील मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयातून 33 वर्ष सेवा देऊन निवृत्त झाले.त्यानिमीत्ताने सत्कार करण्यात आला. सामाजिक,सांस्कृतिक ,शैक्षणिक, साहित्यिक , पत्रकारिता क्षेत्रामध्ये ते संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जातात. वैशिष्ठ म्हणजे जामोदे सर यांनी त्यांच्या शिक्षणीक जीवनाचा प्रारंभ सेठ बन्सीधर विद्यालयातूनच केलेला होता. महाराष्ट्रातील विविध दैनिकांमधून त्यांचे स्तंभ लेखन, तसेच काव्य लेखन प्रकाशित होत असते. अनेक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये त्यांनी सहभाग नोंदविला आहे.