आपला जिल्हा

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना.

जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण,पुढील तिमाहीत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत-महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र

शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी
मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजना.
जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे होणार २०५ मेगा वॅट वीज निर्माण,पुढील तिमाहीत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत-महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र

अकोला, दि. ३० : मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० द्वारे शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पूर्ण होत आहे. अकोला जिल्ह्यात ६३ प्रकल्पांद्वारे २०५ मेगावॅट वीजनिर्मिती होणार असून, येत्या तिमाहीत हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. लोकसंवाद व पाठपुराव्यातून कामाला गती द्यावी, असे निर्देश ‘महावितरण’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी आज येथे दिले.
नियोजनभवनात आयोजित मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनीच्या जिल्हास्तरीय टास्क फोर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.जिल्हाधिकारी अजित कुंभार, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम, पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, ‘महावितरण’चे संचालक सचिन तालेवार, सौर सल्लागार श्रीकांत जलतारे आदी यावेळी उपस्थित होते.

लोकेश चंद्र म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने सुरू झालेली ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०’ अन्य राज्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांद्वारे पुढील एक वर्षात १६ हजार मेगावॅट वीज शेतीला दिवसा पुरवठ्यासाठी मिळणार आहे. अकोला जिल्ह्यात ६३ उपकेंद्राच्या क्षेत्रात २०५ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प निर्माण होणार आहेत.
जिल्ह्यात १२ प्रकल्प कार्यान्वित
सध्या जिल्ह्यात १२ ठिकाणी ५५ मेगावॅट सौर प्रकल्पांची कामे पूर्ण झाली आहेत. त्याद्वारे १९ हजार शेतक-यांना दिवसा वीजेचा लाभ मिळत आहे. उद्दिष्टानुसार उर्वरित काम पूर्णत्वास जाण्यासाठी टास्क फोर्सने पुढाकार घ्यावा. त्यासाठी लोकसंवाद व प्रबोधन करावे. सौर प्रकल्पांसाठी आवश्यक शासकीय व खाजगी जमीन उपलब्ध करून घेणे, भूसंपादन व सौर प्रकल्पांसाठी आवश्यक पायाभूत सेवेत सुधारणा आदी कामांना गती द्यावी, स्वातंत्र्यदिनी ग्रामसभेत याबाबत जागृती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

प्रकल्पांसाठी शासकीय जागा मिळवून देण्यात अकोला जिल्हा आघाडीवर आहे. शासकीय इमारतींवरील सौर- विद्युती करणातही गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात ८५० इमारतींवर सोलरायझेशनसाठी प्रयत्न होत आहेत. त्याचप्रमाणे, मॉडेल म्हणून २८ गावांना सौर-ग्राम करण्याचाही प्रयत्न आहे. सौर निर्मिती प्रकल्पांद्वारे शेतीला दिवसा वीजपुरवठ्यासाठी प्रकल्पनिर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वेगाने कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी सांगितले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!