तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन.
शेतकरी कर्जमाफी साठी प्रहार उतरली रस्त्यावर.
तेल्हारा येथे प्रहारचे चक्काजाम आंदोलन.
शेतकरी कर्जमाफी साठी प्रहार उतरली रस्त्यावर.

शेतकरी कर्जमाफी करिता संपूर्ण महाराष्ट्र मध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचा आदेश प्रहारचे सर्वेसर्वा बच्चुभाऊ कडु यांनी दिला होता त्या साठी प्रहार जनशक्ति पक्ष तेल्हारा तालुका, प्रहार अपंग संघटना तेल्हारा यांचे वतीने आज तेल्हारा येथे महात्मा फुले चौक, घोडगांव चौफुली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
प्रहारचे बच्चुभाऊ कडु हे शेतकरी, दिव्यांग, कामगार यांचे करिता तत्पर असतात. बच्चुभाऊ कडु यांनी मागील महिने मध्ये आठ दिवस बेमुद्दत अन्नत्याग आंदोलन मोझरी केले होते तसेच सात बारा कोरा या करिता पदयात्रा काढुन कर्जमाफी करावी,दिव्यांग यांचे पगारवाढ करावी यासह विविध सतरा मागणी शासनाकडे केली पण शासन अमंलबजावणी करायला नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाने अकोला जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, महासचिव राजेश पाटील खारोडे, जिल्हाप्रमुख कुलदीप पाटील वसु यांच्या मार्गदर्शनात तेल्हारा तालुक्यात ज्ञानेश्वर आखरे तालुकाध्यक्ष, संदीप ताथोड अपंग प्रहार संघटना जिल्हा कार्याध्यक्ष, सौ संध्याताई ताथोड महिला जिल्हाध्यक्ष, भैय्या देशमुख युवक अध्यक्ष, विक्की मल्ल शहराध्यक्ष यांच्या नेतृत्वात आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
यावेळी प्रहार युवक उपजिल्हाप्रमुख सुरज भैय्या खारोडे,उमेश कोरडे,शिवाजी जोत, संतोष गिरे, प्रहार अपंग संघटना तालुका प्रमोद तायडे, युवक ता अध्यक्ष गौरव अरबट, शंकर कडू, हर्षल गावंडे, मोहन वरणकर, अध्यक्ष शिव कराऴे, महिला तालुकाध्यक्षा ज्योती गाडेकर, विष्णू सपकाळ सह तालुक्यातील शेतकरी, प्रहार सेवक, दिव्यांग बांधव मोठ्या असंख्य उपस्थित होते.