तेल्हारा नगरपरिषद वसुली पथकाची धडक कारवाई.
थकबाकीदारांची मालमत्ता सील.

शासनाच्या धोरणानुसाठी 100 टक्के कर वसुली बाबत सन 2024 -25 या वर्षाकरिता कर वसुली मोहीम नगर परिषद तेल्हारा वसुली पथकाव्दारे राबविण्यात येत आहे.त्या दृष्टीने ज्या थकबाकीदारांनी पूर्व सूचना देवून सुद्धा भरणा केला नाही अशा वर धडक मोहीम राबवून सिलिंग जप्ती ची कारवाई सुरू केली आहे.
या मोहिमेसाठी चार वसुली पथक व एक जप्ती पथकाची नेमणूक करण्यात आले असल्याचे कर निरीक्षक चैतन्य देशमुख यांनी सांगितले आहे. यापूर्वी थकबाकीदार इमारत व गाळे तसेच खुल्या जागा धारकांना नगरपरिषद तेल्हारा कडून नियम 150 अंतर्गत नोटीस व नियम 152 अंतर्गत अधीपत्र बजावण्यात आले होते. मात्र थकबाकीदार यांनी भरणा न केल्या मुळे वसुली पथकाकडून थकबाकीदारांचे व व्यावसायिक गाडे यांच्यावर सीलिंग ची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. सोमवार दिनांक 24 मार्च 2025 रोजी अग्रेसर चौक तेल्हारा येथील थकबाकीदार व्यावसायिक गाळे धारकांवर सिलिंग ची कार्यवाही करून जप्ती करण्यात आली आहे.
सर्व थकबाकीदार यांनी मुदतीमध्ये कर भरणा करून सिलिंग ची कार्यवाही टाळण्यासाठी कर विभाग न प तेल्हारा यांना सहकार्य करण्याबाबत सतीश गावंडे मुख्याधिकारी तेल्हारा यांनी सर्व थकबाकीदार यांना याव्दारे आवाहन केले आहे .