Uncategorized

‘बार्टी’चे पाच विद्यार्थी असिस्टंट कमांडंटपदी.

संघ लोकसेवा आयोगाकडून ही परीक्षा घेतली. 

‘बार्टी’चे पाच विद्यार्थी असिस्टंट कमांडंटपदी.
संघ लोकसेवा आयोगाकडून ही परीक्षा घेतली. 

नागपूर, दि. 25 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) तर्फे नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षा पूर्वतयारी अभ्यासक्रमाच्या पाच विद्यार्थ्यांची केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात असिस्टंट कमांडंटपदी निवड निवड झाली आहे.
येत्या मे अखेरपर्यंत त्यांचे हैद्राबाद येथे केंद्रिय सशस्त्र पोलीस दलासाठी प्रशिक्षण सुरु होणार आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांत व्यंकट प्रकाश गायकवाड, अजित सूर्यकांत खरात, मयुर दिपक रंगारी, रोशन अरविंद कडू, अजय इट्खरे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
संघ लोकसेवा आयोगाकडून ही परीक्षा घेतली जाते. सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF), भारत-तिबेट सीमा पोलीस (ITBP) आणि सशस्त्र सीमा बल (SSB) यांचा या सेवेत समावेश होतो. या दलांची भूमिका प्रामुख्याने अंतर्गत धोक्यांपासून राष्ट्रीय हिताचे रक्षण करणे आहे.
बार्टीमार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण योजनेअंतर्गत पूर्व, तसेच मुख्य परीक्षेचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण योजनेत विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारावर केली जाते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन, मोफत प्रशिक्षण, प्रवास भत्ता दिला जातो.
बार्टीमार्फत पूर्वतयारी प्रशिक्षण योजनेत दिल्ली येथील कोचिंग संस्थामध्ये कोचिंग, नागरी सेवा (प्राथमिक) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आणि (मुख्य) परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य दिले जाते. व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना आर्थिक सहाय्य योजना राबविल्या जातात. या सर्व योजनांची विस्तृत माहिती बार्टीच्या www.barti.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी या सर्व योजनांची माहिती घेऊन त्याचा लाभ घेण्याचे आवाहन बार्टीचे महासंचालक सुनील वारे यांनी केली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे मनोगत:
बार्टीच्या विद्यावेतनाने परिस्थिती सुधारली:
रोशन अरविंद कडू, अमरावती – माझे आईवडील शेतमजूर व घरी तीन भावंडे आहेत. घराला लोखंडी पत्र्याचे छप्पर आहे. आईच्या प्रेरणेने शिकलो. शिक्षणासाठी गावोगाव भटकंती केली. मित्रांकडून बार्टीबाबत माहिती मिळाली. युपीएससी परीक्षेबाबत कळले. अभ्यास सुरु केला. पण आर्थिक अडचणींनी हैराण होतो. बार्टीच्या युपीएससी योजनेत निवड झाली. प्रशिक्षणादरम्यान मिळणा-या विद्यावेतनाने शिक्षणाचा हुरूप आला. आज बार्टीमुळे आईवडीलांचे व माझे अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करु शकलो.

बार्टीच्या प्रशिक्षणाने आत्मविश्वास दिला: व्यंकट प्रकाश गायकवाड, लातूर – माझे आई वडील वीटभट्टीच्या कामाला जातात. घरी आम्ही सहा भावंडे आहोत. त्यात मी लहान आहे. खूप पायपीट करुन शिकलो. आईवडीलांच्या श्रमाचे मोल फेडायचे होते. म्हणून हॉटेलात काम केले. लातुरला मित्रांच्या सोबतीने स्पर्धा परीक्षेची तयारी केली. तरी दिल्लीसारख्या ठिकाणी या स्पर्धेत टिकू की नाही अशी भीती होती. पण बार्टीने दिलेल्या प्रशिक्षणाने आत्मविश्वास वाढला. विद्यावेतनाने परिस्थिती सुधारली. केवळ बार्टीमुळे मी आज ही झेप घेऊ शकलो.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!