तेल्हारा येथील चार बुद्धीबळ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त.
स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तथा जिनियस चेस एकडमी चे विद्यार्थी.
तेल्हारा येथील चार बुद्धीबळ खेळाडूंना आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त.
स्वामी विवेकानंद ज्ञानपीठ तथा जिनियस चेस एकडमी चे विद्यार्थी.

अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील रहिवाशी असलेल्या चार बुद्धीबळ खेळाडू नी आपल्या खेळाचे उत्कृष्ठ प्रदर्शन करीत आंतरराष्ट्रिय नामांकन प्राप्त केले.
नुकत्याच नागपूर येथे दि. 8 ते 15 मे 2025 रोजी जीं एच रायसोनी इंजिनियरींग कॅम्पस येथे झालेल्या टूर्नामेंट मध्ये मुलांनी बाजी मारली आहे. ज्यामध्ये अती जलतगती प्रकारा मध्ये राज पंकज भारसाकळे याने इंटरनेशनल चेस रेटिंग 1638 घेतली आहे. तसेच चिन्मय अनुप उंबरकर याने आपली रेटिंग वाढ करीत क्लासिकल बुद्धीबळ खेळामध्ये 1599 रेटिंग घेतली.
त्याचप्रमाणे कनिष्क सपकाळ याने सुद्धा जलदगती प्रकारा मध्ये 1481 रेटिंग व अती जलतगती 1504 प्राप्त केली आहे. उत्कर्ष ज्ञानेश्वर बाजोड याने जलतगती मध्ये 1447 रेटिंग प्राप्त केली आहे.
मुंबई येथे पार पडलेल्या क्लासिकल टूर्नामेंट मध्ये मोहित जितेंद्र भैय्या याने 1407 रेटिंग प्राप्त केली आहे.
आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत नागपूर, मुंबई, तेल्हारा येथील केलेल्या खेळाचे चांगले प्रदर्शन यामुळे परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे. आपल्या यशाचे श्रेय आंतरराष्ट्रीय नामांकन प्राप्त प्रशिक्षक बाळासाहेब बोदळे सर तसेच त्यांच्या आई-वडील, गुरु जनांना देतात.