प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील परिक्षेपूर्वीच्या घाईघाईच्या उपक्रमामुळे राज्यातील शिक्षक व विदयार्थी अस्वस्थ.
ना.दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री यांना पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन.
प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील परिक्षेपूर्वीच्या घाईघाईच्या उपक्रमामुळे राज्यातील शिक्षक व विदयार्थी अस्वस्थ.
ना.दादाजी भुसे शालेय शिक्षण मंत्री यांना पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने निवेदन.
माहे मार्च व एप्रिल मधील घाईघाईच्या उपक्रमामुळे राज्यातील शिक्षक व विदयार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरत असल्याने त्याबाबत योग्य ते निर्णय घ्यावेत या आशयाचे निवेदन महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दादाजी भुसे यांना नुकतेच मेल द्वारे पाठविण्यात आले .
मार्च हा महिना वर्षभरात शिकवलेल्या पाठ्यक्रमाच्या उजळणीचा व माहे एप्रिल हा महिना उर्वरीत उजळणीसह परिक्षा घेवून पेपर तपासणी व मुल्यांकनाचा असतो. मात्र हे काम न करता शिक्षक या महिण्यात वेगळयाच कामात व्यस्त आहेत .त्यामुळे विदयार्थ्यांच्या मुल्यमापन या वर्षभरातील महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होत आहे.
स्काफ ( SQAAF )- स्काफची १२८ मानकं भरतांना मुख्याध्यापक व एक सहकारी शिक्षक पुर्णपणे व्यस्त झाले आहे.यामध्ये शाळांमध्ये इंटरनेट सुविधा व त्यासाठीचा निधी उपलब्ध नसल्यामुळे पुरावे गुगल ड्राईव्ह वर अपलोड करण्याचे काम शक्य होत नाही. ही एक मोठी किचकट प्रक्रिया ठरवलेली आहे. हे करतांना जिल्हा परिषद शाळेत संगणक तज्ज्ञ शिक्षक व पुर्णवेळ लिपीक उपलब्ध आहेत की नाही याचा सुद्धा विचार केलेला नाही. प्राथमिक शिक्षकांची अर्हता एच.एस.सी डि.एड. ही आहे या शिक्षणानंतर संगणकावर ऑनलाईनची मोठी व क्लिष्ठ कामे त्याला करता येणे शक्यच नाही. तसेच अनेक शाळांमध्ये महिला शिक्षीका आहेत, अनेक शाळा दोन शिक्षकी शाळा आहेत, अनेक शाळांमध्ये संगणक उपलब्ध नाहीत, अनेक शाळांमध्ये विज तर आहे परंतू घरगुती दराने येत असलेल्या विजबिलामुळे व ते भरण्यासाठी शाळेत पुरेसा निधी उपलब्ध नसल्यामुळे २ लाईट व २ पंखे यापेक्षा जास्त विज वापरण्याची हिंमत सुद्धा शाळांमध्ये नाही .अशावेळी स्काफ सारखी किचकट ऑनलाईनची कामे शाळांनी करण्याची अपेक्षा करणे हे अवास्तव वाटते. तसेच त्यानंतर हे सर्व पुरावे ऑफलाईन सुद्धा उपलब्ध करून ठेवायचे असल्याने स्काफ व अशाच उपक्रमासाठी ऑनलाईनची सक्ती करण्यात येवू नये.
वार्षिक परिक्षा वेळापत्रक बदलवण्यात यावे सत्र २०२४-२५ च्या वार्षिक परिक्षा एप्रिल महिण्याच्या शेवटी ठेवल्या आहेत त्यामुळे सर्वंकष मुल्यमापन, प्रकल्प, पेपर तपासून निकाल करणे, विदयार्थ्यांना उन्हाळी अभ्यास देणे यासाठी वेळ अपुरा पडत आहे तसेच विदर्भामध्ये उष्णतेची लाट असते त्यामुळे एप्रिल अखेर तर अधिकच गर्मी वाढते, उष्माघाताने अनंकांचा मृत्यू देखील होतो अशावेळी विदयार्थ्यांना पेपर सोडवणे व भर उन्हात घरी जाणे अवघड होईल यास्तव वार्षिक परिक्षा एप्रिल अखेर न ठेवता १५ एप्रिल पासुन सुरू केल्यास योग्य होईल. निपुण भारत अंतर्गत कृति कार्यक्रम उन्हाळी सुटीकालावधीत ठेवू नये नियोजित कृति कार्यक्रम चांगल्या भावनेने आखण्यात आलेला आहे मात्र वर्षभराच्या शैक्षणिक व्यस्ततेनंतर विदयार्थ्यांना व शाळांना उन्हाळी सुट्टी असते अशावेळी ते लग्न व अन्य समारंभानिमित्य नातेवाईकांकडे जाण्याचे नियोजन करतात. त्यामुळे त्यांना या कार्यक्रमाच्या बंधनात अडकवून त्यांच्या उत्साहावर विरजन टाकल्यासारखे होईल. तसेच विदयार्थ्यांच्या वाढत्या मोबाईल वापरामुळे पालक आधिच त्रस्त आहेत लहान वयात ऑनलाईन च्या वापरामुळे त्यांना अनेक चुकीच्या सवयी लागत असल्यामुळे पालक त्यांना मोबाईल पासुन दुर ठेवण्याचा प्रयत्न करत असतांना उन्हाळयाच्या सुटी काळात त्यांना पुन्हा मोबाइल सक्ती करून ऑनलाईन अभ्यास देणे चुकीचे होणार नाही का? करीता उन्हाळी सुटीतील हा उपक्रम २६ जुन नंतर सुरू करण्यात यावा म्हणजे शाळा पुर्व तयारीसाठी याची मदत मिळू शकेल.
माहे मार्च व एप्रिल महिना विना माहिती, विना प्रशिक्षण, विना सभा घोषित करणे माहे मार्च व एप्रिल महिण्यात शिक्षकांना फक्त शिकवण्याचेच काम असायला पाहिजे मात्र सातत्याने पाठवावी लागणारी माहिती, सभा व प्रशिक्षणासाठी शिक्षकांना शाळेबाहेर ठेवणे यामुळे या महत्वाच्या महिष्यात ते विदयार्थ्याकडे पुर्ण लक्ष देवू शकत नाही करीता त्यामुळे माहे मार्च व एप्रिल महिना विना माहिती, विना प्रशिक्षण, विना सभा घोषित करण्यात यावा.
उपरोक्त विषयांचा गांर्भियाने विचार करून राज्यातील प्राथमिक शिक्षणाच्या हिताचे योग्य ते निर्णय व्हावेत .
अशी मागणी संघटनेच्या वतीने प्रसाद पाटील राज्याध्यक्ष, हरीश ससनकर राज्य सरचिटणीस यांच्या स्वाक्षरीने पाठविले अशी माहिती राज्य कोषाध्यक्ष जी एस मंगनाळे, अकोला जिल्हाध्यक्ष संघर्ष सावरकर,सांगली जिल्हाध्यक्ष दिवानजी देशमुख,गोंदिया जिल्हाध्यक्ष हरिराम येळणे,कोल्हापूर जिल्हाध्यक्ष एस.के.पाटील,वाशीम जिल्हाध्यक्ष इरफान मिर्झा ,धुळे जिल्हाध्यक्ष भुपेश वाघ,वर्धा जिल्हाध्यक्ष राजकुमार जाधव यांनी दिली आहे.