“सन्मान स्त्री कर्तुत्वाचा “या आशयाखाली “बेटी बचाव” अभियान अंतर्गत विविध स्पर्धा.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचा पुढाकार.
“सन्मान स्त्री कर्तुत्वाचा “या आशयाखाली “बेटी बचाव” अभियान अंतर्गत विविध स्पर्धा.
जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचा पुढाकार.

अकोला दि. -अकोला येथील जिएमसी हाॅल मध्ये PCPNDT कार्यक्रमांतर्गत मा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ तरंगतूषार वारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली “सन्मान स्त्री कर्तुत्वाचा “या आशयाखाली “बेटी बचाव” या विषयावर कार्यक्रम संपन्न झाला यावेळी येथे नृत्य स्पर्धा व वेशभूषा स्पर्धांचे आयोजन तसेच सन 2024- 25 या वर्षात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिला कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
आयोजित कार्यक्रमाकरिता उद्घाटक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला बी वैष्णवी मॅडम ह्या उपस्थित होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बळीराम गाढवे जिल्हा आरोग्य अधिकारी अकोला,डॉ आशिष गिऱ्हे आरोग्य वैद्यकीय अधिकारी मनपा अकोला ,डॉ.आशा मिरगे सामाजिक कार्यकर्ता तथा स्त्रीरोग तज्ञ ,डॉ.सीमा तायडे,स्त्री रोग तज्ञ डॉ.वंदना बागडी स्त्री रोग तज्ञ, स्त्री रोग तज्ञ डॉ.रेखा पाटील, श्रीमती प्रतिभा अवचार सामाजिक कार्यकर्ता तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अधिनस्त असलेल्या सर्व ग्रामीण रुग्णालय तसेच उपजिल्हा रुग्णालय येथील आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी “बेटी बचाव “या विषया वरील नृत्य सादर केले .या स्पर्धेकरिता परीक्षक म्हणून श्रीमती नताशा शर्मा मुख्याध्यापिका बाऊसी बाउन्स स्कूल अकोला व श्रीमती पल्लवी डोंगरे अँकर आर आर सी चैनल अकोला ह्या उपस्थित होत्या . डॉ वंदना बागडी मॅडम यांनी महिलांमधील कर्करोग याबाबत उपस्थिताना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता शिरसाट अधिपरिचारिका व सुकेशिनी शिरसाट पी एच एन यांनी तर आभार प्रदर्शन ॲड शुभांगी ठाकरे जिशची कार्यालय अकोला यांनी केले.