सेठ बंसीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटी शताब्दी महोत्सवी सामाजिक उपक्रमांतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर.
128 रूग्णाची तपासणी, 21 रूग्णांची मोफत शस्त्रक्रिया.
सेठ बंसीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटी शताब्दी महोत्सवी सामाजिक उपक्रमांतर्गत मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर.
128 रूग्णाची तपासणी, 21 रूग्णांची मोफत शस्त्रक्रिया.

तेल्हारा – दि.
सेठ बंसीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी महोत्सवी वर्षानिमित्त दहावे पुष्प म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरासाठी शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. संजीव राठोड, डॉ. गौरव राठोड (खामगाव) व त्यांचे सहकारी डॉक्टरांनी आपली सेवा बजावली. शिबिराचा लाभ 128 रुग्णांनी घेतला. यापैकी 21 रुग्णांवर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्स प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच 61 रुग्णांना मोफत चष्मे, औषधी व ड्रॉपचे वितरण करण्यात आले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल यांनी भूषविले. प्रमुख उपस्थितीत उपाध्यक्ष बेनिप्रसाद झुंझुनवाला, व्यवस्थापक राजेंद्र शाह, संचालक व स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाचे अध्यक्ष विठ्ठलराव खारोडे, अश्विनीताई खारोडे, विष्णू मल्ल, डॉ. विक्रम जोशी, पुष्कर तागडे, शिवम पाडिया, ओमप्रकाश झुंझुनवाला, प्राचार्य गोपाल फाफट, उपप्राचार्य प्रदीप वाघ, पर्यवेक्षक राजेंद्र कोरडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल व व्यवस्थापक मंडळाने प्रमुख मान्यवरांचा शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन ज्येष्ठ शिक्षक मुकुंद सोनेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्य गोपाल फाफट यांनी केले.
संस्था आणि संचालक मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत घेतलेला हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असून, ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना मोठा दिलासा देणारा आहे. दरवर्षी संस्था विविध रोग निदान शिबिरे, रक्तदान शिबिरे, मोफत औषधी व वैद्यकीय साहित्य वितरण यांसारखे उपक्रम राबवत असते. याच परंपरेचा भाग म्हणून यंदाचे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर यशस्वीपणे पार पडले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी ज्येष्ठ कला शिक्षक सुनील देशमुख यांचे विशेष योगदान राहिले. या कार्यक्रमाला संस्थेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.