बारी समाजातील विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन.
संत रूपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक अंजनगाव सुर्जी येथे करण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील बांधवांची कृतज्ञता व्यक्त.
बारी समाजातील विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन.
संत रूपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक अंजनगाव सुर्जी येथे करण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील बांधवांची कृतज्ञता व्यक्त.
तेल्हारा – दि.
संत रूपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक अंजनगाव सुर्जी जि अमरावती येथे मंजुर करण्यात आले होते त्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तेल्हारा तालुक्यातील समस्त बारी समाज बांधवाचे वतीने तहसीलदार तेल्हारा समाधान सोनवणे यांचे मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस साहेब यांना समाजाचे वतीने निवेदन दि. 15 सप्टेंबर ला देण्यात आले.
समस्त बारी समाजाचे वतीने देण्यात आलेल्या निवेदनात,बारी समाजासाठी संत रूपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक अंजनगांव सुर्जी जि. अमरावती येथे मंजुर केले आहे व त्या प्रमाणे कार्यवाही करण्याचे निर्देश मा. जिल्हाधिकारी अमरावती यांना दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी अमरावती यांनी दि. 23/01/2025 रोजी महासंघाची बैठक घेवून स्मारकाचा प्रस्ताव प्रशासकिय मंजुरीसाठी व आर्थिक तरतुदीसाठी महाराष्ट्र शासनाने पाठविला आहे.
तसेच बारी समाजाच्या आर्थीक उन्नतीसाठी संत रूपलाल महाराज आर्थीक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. तथापी संचालक मंडळाची नेमणुक प्रलंबित आहे.
संपुर्ण बारी समाजाच्या वतीने आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. बारी समाजाच्या दोन्ही मागण्या मंजुर केल्याने देशातील बारी समाज आपला ऋणी आहे व समाजाने महाराष्ट्रात जागोजागी मेळावे घेवून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
संत रूपलाल महाराज राष्ट्रीय स्मारकाचे भूमीपूजन आपल्या शुभहस्ते येत्या दिवाळीपुर्वी व्हावे ही मागणी निवेदनात करून आपणास नम्र विनंती केली आहे.
तसेच आर्थीक विकास महामंडळाचे कामकाज सत्वर सुरू व्हावे व त्यावर बारी समाजाचे संचालक मंडळाची नेमणुक करावी, समाजाची मिटींग तत्पर लावून आमचा जिव्हाळयाचा विषय मार्गी लावावा असे म्हटले आहे निवेदनावर रमेशचंद्र घोलप बारी, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय बारी महासंघ, सुभाष रौदंळे, अशोक नाठे, नरहरी हागे, विजय घायल,भगवान हागे, विलास ताडे,मधुकर पोके,गोपाल राऊत, राजेश अस्वार,सागर लांडे, रामेश्वर नाठे,गणेश रेखाते, श्याम ताडे, प्रथमेश नाठे, दिपमाला दामोदर, अशोक घायल, सुनील धुरडे, संजय हागे इत्यादी सह बहूसंख्य समाज बांधवाच्या स्वाक्षरी आहेत.