आपला जिल्हा

तेल्हारा येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे सायबर मार्गदर्शन कार्यशाळा.

सायबर वॉरियर साक्षी फाटकर आणि हर्षा बिहाडे यांनी विद्यार्थ्यांना केले सजग.

तेल्हारा येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे सायबर मार्गदर्शन कार्यशाळा.
सायबर वॉरियर साक्षी फाटकर आणि हर्षा बिहाडे यांनी विद्यार्थ्यांना केले सजग.

श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे सायबर सुरक्षा या विषयावर विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती या कार्यशाळेमध्ये शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यशाळे करिता शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयाच्या सायबर वॉरियर साक्षी फाटकर आणि हर्षा बिहाडे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेटच्या चुकीच्या वापरामुळे सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत या विषयावर त्यांनी महत्त्वाची माहिती सांगून विद्यार्थ्यांना सजग केले. विद्यार्थ्यांना मोबाईल आणि इंटरनेटचा चुकीचा वापरामुळे म्हणजे मोबाईल मध्ये व्हाट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुक तसेच मोबाईल मधील गेम खेळल्यामुळे वाईट परिणाम कसे होतात, वेबसाईटच्या माध्यमातून फसवणूक कशी होते आणि आपण यापासून कसे सुरक्षित रहावे याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
त्यांनी विद्यार्थ्यांना सेटिंग सांगितले जसे की टू स्टेप वेरिफिकेशन आणि टू फॅक्टर अथेंतिफिकेशन करावे, सर्टिफिकेट असलेल्या वेबसाईटला विजिट करावे अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सुरक्षितता सांगितल्या. विद्यार्थ्यांना काही शंका होत्या तेही त्यांनी दूर केले.
तसेच श्री शिवाजी हायस्कूल तेल्हाराचे प्राचार्य व्हि.जी.गावंडे यांच्या परवानगीने ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेमध्ये विद्यालयातील मुख्याध्यापक व्हि.जी.गावंडे, सौ. प्रेरणाताई कराळे मॅडम, शांतीकुमार सावरकर सर,अंकेश भांबुरकर सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
सदर कार्यशाळा शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालय अकोलाचे प्राचार्य डॉक्टर जे .एम. साबू सर, समन्वयक डॉक्टर दीप्ती पेठकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली व क्विक हिल फाउंडेशन पुणे आणि महाराष्ट्र सायबर सेल यांच्या सहाय्याने करण्यात आली. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वाच्या सहकार्याने कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!