Uncategorized

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर _ अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया अधिवेशनात डॉ.भागवत कराड., अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख. 

पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर _ अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया अधिवेशनात डॉ.भागवत कराड., अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख. 

  • पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी नेहमीच तत्पर
    _ अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या डिजिटल मीडिया अधिवेशनात डॉ.भागवत कराड., अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख.

छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) – पत्रकार हे वर्षानुवर्ष समाजासाठी काम करतात. त्यांच्या समस्या मी नेहमीच गांभीर्याने घेत असतो. त्यामुळे पत्रकारांच्या आरोग्यविषयक व रेल्वेविषयक समस्या सोडविण्यासाठी मी कसोशीने प्रयत्न करीन, असा विश्वास माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री तथा राज्यसभा खासदार डॉ. भागवत कराड यांनी व्यक्त केला.


अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनात डॉ.भागवत कराड बोलत होते.अध्यक्षस्थानी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख होते.
यावेळी व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, डिजिटल मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस प्रा.सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मंजूरभाई शेख, उपाध्यक्ष गणेश मोकाशी, गो.पी.लांडगे, लातूर विभागीय सचिव सचिन शिवशेटे, ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे, डॉ.अनिल फळे, डॉ.मोहम्मद अब्दुल कदीर, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष बालाजी सूर्यवंशी, सचिव प्रकाश भगनुरे, कार्याध्यक्ष कानिप अन्नपूर्णे, मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे, उपाध्यक्ष महादेव जामनिक, कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी डॉ.भागवत कराड यांनी पत्रकारांच्या विविध समस्यांविषयी सोडवणूक करण्यासंबंधी मार्गदर्शन केले. तसेच पत्रकारांच्या आरोग्यविषयक, रेल्वेविषयक व छोट्या-मोठ्या व्यवसायाला बळकटी देण्यासाठी मुद्रा लोन विषयी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. प्रमुख वक्ते तुळशीदास भोईटे व रवींद्र पोखरकर यांनी मार्गदर्शन केले.


ज्येष्ठ पत्रकार धनंजय लांबे यांनी “ए.आय. आणि मराठी पत्रकारिता”, या विषयावर तर डॉ.अनिल फळे यांनी “डिजिटल मीडिया : श्वास महाराष्ट्राचा”, या विषयावर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत अध्यक्ष बालाजी सूर्यवंशी,सचिव प्रकाश भगनुरे, कार्याध्यक्ष कानिफ अन्नपूर्णे, मुंबई प्रतिनिधी सुनील वाघमारे, उपाध्यक्ष महादेव जामनिक,कोषाध्यक्ष ब्रह्मानंद चक्करवार, धनंजय लांबे, डॉ. अनिल फळे, डॉ.मोहम्मद अब्दुल कदीर यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात एस.एम.देशमुख यांनी डिजिटल मीडियाच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. सरकार अद्यापही यु ट्युबच्या पत्रकारांना पत्रकार मानायला तयार नाही. पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात राज्य सरकार चालढकल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पत्रकार संरक्षण कायदा मंजूर होऊन सात वर्षे झाली. तरी सरकार अद्यापही अधिसूचना काढायला तयार नाही. पत्रकारांच्या पेन्शनचे, अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे प्रश्न प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.
अधिवेशनाचे प्रास्ताविक बालाजी सूर्यवंशी यांनी तर आभार प्रकाश भगनुरे यांनी मानले. या अधिवेशनात ज्येष्ठ पत्रकार राम अग्रवाल, नागेश गजभिये, स.सो.खंडाळकर, डॉ,धनंजय लांबे, डॉ. मोहम्मद अब्दुल कदीर, जगन्नाथ सुपेकर, रमेश खोत, यांचा पत्रकारितेतील दीर्घ सेवेबद्दल सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. या अधिवेशनासाठी राज्यभरातील मुद्रित माध्यमे, इलेक्ट्रॉनिक मीडिया, यु ट्युब चॅनेल व पोर्टलच्या पत्रकार व संपादकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!