दानापूर येथे महिला पदाधिकारी यांच्या हस्ते झाले श्री गुरुदेव सुसंस्कार शिबीराचे मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न.
शहिद भारतीय शुरवीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.
दानापूर येथे महिला पदाधिकारी यांच्या हस्ते झाले श्री गुरुदेव सुसंस्कार शिबीराचे मोठ्या थाटात उद्घाटन संपन्न.
शहिद भारतीय शुरवीर जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.

तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील श्री गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामस्थ यांच्या वतीने १० में पासून श्री गुरुदेव सुसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन येथील महिला पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ सपनाताई वाकोडे, प्रमुख उपस्थितीत माजी जिल्हा परिषद सदस्य सौ राधिकाताई ढाकरे, मा जिल्हा परिषद सदस्य तथा माजी सरपंच सौ दिपमालाताई दामधर, माजी प स सदस्य सौ राजश्रीताई ढाकरे, माजी सरपंच सौ सुनिताताई मिसाळ, माजी सरपंच सौ अनुराधाताई गोयंनका, यांनी सर्व प्रथम दिप प्रज्वलन करून व वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून शिबीराचे उद्घाटन करण्यात आले,सामुदायिक प्रार्थनेने शिबीराला प्रारंभ झाला.

यावेळी प्रार्थनेवर आकोट प्रचार प्रमुख हभप निमंकर्डे महाराज ,यांनी आपले विचार प्रकट केले. सर्व प्रथम देशासाठी लढतांना विरगती प्राप्त झालेल्या शुरवीर भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. जयघोषानतंर महिला पदाधिकारी यांचा आयोजकांच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सौ राधिकाताई ढाकरे,सौ दिपमालाताई दामधर, अनुराधाताई गोयंनका यांनी शिबीरार्थी विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्यात. तसेच डॉ रामरावजी मिसाळ, रविंद्र दामधर गुरुजी यांनी विद्यार्थ्यांना शिबीराचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिकराव इंगळे गुरुजी संचालन अँड अजितदादा शेंगर तेल्हारा तालुका सेवाधिकारी आभार पत्रकार संजय हागे यांनी केले.
यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक डॉ मिसाळ, वासुदेवराव येऊल, बंडु भाऊ ढाकरे, माजी सरपंच महादेवराव वानखडे, रविंद्र दामधर गुरुजी,माणिकराव वाघमारे, वसंत टाले, रामचंद्र वाघमारे,धम्मापाल वाकोडे,श्रीकृष्ण भगत,संतोष वाघमारे,अमोल वाघ, योगेश येऊल, रविंद्र तायडे ,संजय चव्हाण, पद्माकर लाहोळे, गिरधरजी खोने,बाळा भाऊ बावणे, गोपाल झुने,गणेश दांदळे,बाळू घायल, मोहन हागे, देविदास भालेराव, श्रीकांत यवतकार,गुरुदेव सेवा मंडळाचे महिला, तथा सर्व उपासक उपासिका, पालक,शिबीरार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.