तेल्हारा येथे ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद विरांना आदरांजली सभा.
माजी सैनिक संघटनेचे आयोजन.

तेल्हारा शहरातील भागवत मंगल कार्यालय येथे माजी सैनिक संघटना व शहर वासी यांच्या वतीने आयोजित ऑपरेशन सिंदूर मध्ये शहीद विरांना आदरांजली सभा संध्याकाळी ७ वाजता घेण्यात आली.
पहेलगाम येथे पर्यटक नागरिकांवरिल वरील भ्याड हल्ल्याचा बद्दला म्हणून भारतीय लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूर मध्ये व भारतीय सीमेवर शहीद झालेल्या भारतीय वीरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी लोकजागर मंच चे अनिल गावंडे, राजेश शृंगारकर,सौ.मोणिका वाघ, भवानी प्रताप,दिपक दहि यांनी श्रद्धांजली पर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन माजी सैनिक पांडुरंग खुमकर यांनी केले. यावेळी आजी माजी सैनिक व विविध पक्ष संघटना पदाधिकारी,पत्रकार बांधव, स्त्री पुरुष उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन आजी माजी सैनिक संघटना व समस्त नागरिक तेल्हारा तालुका यांच्यावतीने करण्यात आले होते.