लोकनेते ज्ञानदेवराव गिऱ्हे स्मृतीत पाणपोईं सुरु.
गिऱ्हे कुटुंबियांनी जपला समाजकार्याचा वसा.
लोकनेते ज्ञानदेवराव गिऱ्हे स्मृतीत पाणपोईं सुरु.
गिऱ्हे कुटुंबियांनी जपला समाजकार्याचा वसा.

हिवरखेड येथील सोनवाडी स्टॉप परिसरात प्रवासी वर्ग, विद्यार्थी, महिला, शेतकरी बांधव, मजूर वर्ग, विविध वाहन चालक इत्यादींची दिवसभरात हजारोंच्या संख्येने वर्दळ असते. परंतु तेथे पिण्याच्या शुद्ध पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने भर उन्हाळ्यात नागरिक तहानेने व्याकुळ होत होते. हजारो नागरिकांची ही समस्या सामाजिक वसा घेतलेल्या गिऱ्हे कुटुंबीयांच्या नजरेतून सुटली नाही. गिऱ्हे कुटुंबीयांना लोकनेते ज्ञानदेवराव गिऱ्हे यांच्या सामाजिक कार्याचा वारसा लाभलेला आहे त्यामुळेच
लोकनेते माजी जिल्हा परिषद सभापती ज्ञानदेवजी गिऱ्हे यांच्या स्मृती प्रित्यर्थ संपूर्ण गिऱ्हे कुटुंबीयांकडून नागरिकांच्या तृष्णा तृप्तीसाठी थंडगार शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आली.
शिक्षक विजय खिरोडकार यांच्या हस्ते सदर पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिक्षक उमेश तिडके, गजानन बंड, रफिक भाई, गणेश भड, गणेश कुऱ्हाडे, दीपक दांडगे, संजय गिऱ्हे, निखिल गिऱ्हे विशाल गिऱ्हे यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती.