तेल्हारा येथे प्रा. वसंतराव हंकारे यांची जाहीर व्याख्यान.
डॉ. गोपाळराव खेळकर महाविद्यालय येथे स्वर्गीय भिकाजी शंकर इंगळे बहुउद्देशीय शिक्षण संस्था गाडेगाव चे आयोजन.
तेल्हारा येथे प्रा. वसंतराव हंकारे यांची जाहीर व्याख्यान.
डॉ. गोपाळराव खेळकर महाविद्यालय येथे स्वर्गीय भिकाजी शंकर इंगळे बहुउद्देशीय शिक्षण संस्था गाडेगाव चे आयोजन.

तेल्हारा – डॉ. गोपाळराव खेळकर महाविद्यालय येथे स्वर्गीय भिकाजी शंकर इंगळे बहुउद्देशीय शिक्षण संस्था गाडेगाव व डॉ. गोपाळराव खेळकर महाविद्यालय गाडेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवार दिनांक 22 मार्च 2025 रोजी सायंकाळी ठीक 6 वाजता युवा व्याख्यान, लेखक, समाज परिवर्तनकार प्राध्यापक वसंतराव हंकारे यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या व्याख्यानात न समजलेले आईबाप या विषयावर काळजाला भिडणारे व्याख्यान आपला जीवनात नक्कीच बदल घडवून आणणारे असेल,आपल्याकरिता आईबाप काय करतात आणि आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याची योग्य मार्गदर्शन या व्याख्यानातून केले जाणार आहे. तरी तालुक्यातील सर्व पालक वर्ग व विद्यार्थी युवक युवती यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजकाच्या वतीने आवाहन करण्यात आले.