सेठ बन्सीधर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवांतर्गत माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा.
सन१७५७ते१९६० मधील २००० देशभक्त क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन.
सेठ बन्सीधर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवांतर्गत माजी विद्यार्थी स्नेहमिलन सोहळा.
सन१७५७ते१९६० मधील २००० देशभक्त क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन.
शुक्रवारपासून ३ दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन.

तेल्हारा दि.२०
तेल्हारा येथील सेठ बन्सीधर हायस्कूल च्या स्थापनेचे व नामकरणाचे शताब्दी वर्ष सन २०२५ मध्ये प्रारंभ झाला असून येत्या शुक्रवार २१ मार्च २०२५ रोजी वय वर्ष ८०व त्यापेक्षा ज्येष्ठ माजी विद्यार्थी, आजी माजी सैनिक तथा मान्यवरांचा सत्कार व स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

शाळेच्या शताब्दी महोत्सवा अंतर्गत दि.२१मार्च रोजी शाळेत चंद्रकांत शांताराम शस्त्रसने यांनी संकलित केलेल्या २००० देशभक्त क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे द्वारा प्रदर्शित करण्यात येणार आहे.

तद्वतच तेल्हारा तालुक्यातील भांबेरी येथील देशमुख गुरुजी यांनी संग्रहित केलेल्या इतिहासाकालीन नाणी, वस्तू यांचे प्रदर्शन ३ दिवस प्रदर्शित केले जाणार आहे.
सेठ बन्सीधर हायस्कूल येथील ज्येष्ठ सेवानिवृत्त १०१ वर्षीय शिक्षक दादासाहेब आवदे यांची स्नेहमिलनसंमेलनात विशेष उपस्थिती लाभणार आहे.

माजी विद्यार्थी- गुरुजन स्नेहमिलन समारंभानिमित्त दिनांक २२ व २३ मार्च रोजी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले ८० वर्षे वयापेक्षा कमी वय असलेल्या नोंदणीकृत माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची स्वतंत्र व्यवस्था शाळा व्यवस्थापनाने केली आहे. आनंद मेळावा, शाळा निरीक्षण आणि विविध पारंपारिक खेळदि२२ मार्च रोजी दुपारी ४ ते ६, वास्तु शतकपूर्ती निमित्त होम आहुती द्वारे विधी पूर्वक वास्तुपूजन समारंभ सायंकाळी ७ वाजता पंडित जितेंद्र महाराज छांगाणी यांच्या पौरोहित्याखाली संपन्न होणार आहे.
- याच दिवशी व्याख्यान, कवी संमेलन, गीत गायन, नृत्य, सुंदरकांड तर रविवार २३ मार्च २०२५ रोजी प्रातःकाळी ६.३० वाजता शतकपूर्ती ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत, ७.०० वाजता सामूहिक कवायत, विविध खेळ, सकाळी ११ वाजता समारोपीय कार्यक्रम मान्यवरांच्या व सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी संचालक मंडळाच्या उपस्थितीत संपन्न होणार असून स्नेहमिलन समारंभात सहभागी होणाऱ्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांना नोंदणी वेळी ओळखपत्र प्रदान करण्याची व्यवस्था व्यवस्थापनाने केली आहे.