नीतिमानतेची मुहूर्तमेढ बालपणातच व्हावी लागते – अशोक अमानकर.
संत श्री वासुदेव जी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या मार्गदर्शनात आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिर.
नीतिमानतेची मुहूर्तमेढ बालपणातच व्हावी लागते – अशोक अमानकर.
संत श्री वासुदेव जी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या मार्गदर्शनात आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिर.

विज्ञानाने प्रत्येक गोष्टीची गती वाढविली असल्यामुळे परिणामी प्रत्येकाची प्रतीक्षा करण्याची क्षमता दिवसेंदिवस कमी होत आहे. आज लहान बालकांच्या हातात सुद्धा भ्रमणध्वनी आल्यामुळे त्याच्या पटलावरील आभाशीचित्र जसे क्षणातच बदलते अगदी त्या प्रमाणे आपल्या जीवनातील वास्तविक चित्र सुद्धा बदलले पाहिजे अशी त्याला वाटत असते. प्रत्यक्ष तसे न घडल्यामुळे तो चिडचिडा होऊन टोकाची भूमिका घेताना दिसतो म्हणून गतिमान युगाला नीतिमानतेची जोड असणे आवश्यक असून; त्या नीतिमानतेची मुहूर्तमेढ बालपणातच व्हावी लागते.
ते आज संत श्री वासुदेव जी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या मार्गदर्शनात आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतांना बोलत होते. सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अशोकराव अमानकर पुढे म्हणाले की , अनैतिक विषयाची चव बालकाच्या जिभेला लागून तो स्वैराचारी होण्याआधीच त्याला नैतिक व अनैतिकतेतील अंतर उदाहरणासहित पटवून दिल्या गेले पाहिजे जेणेकरून तो चुकीच्या गोष्टी पासून स्वतःहूनच दूर राहील असे मत त्यांनी व्यक्त केले.
तसेच यावेळी आद्य गुरू शंकराचार्य जयंती साजरी करण्यात आली.सदर्हु कार्यक्रमासाठी शिक्षकेतर सेवाधारी व पालक वर्गाची उपस्थित होती असे ज्ञानेश्वर महाराज भालतिलक कळवितात.