ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव ग्रामपंचायत.
सन २०२३-२४ साठी तेल्हारा तालुक्यातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींची जि.प.प्रशासनाने केली निवड.
ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार तेल्हारा तालुक्यातील गाडेगाव ग्रामपंचायत.
सन २०२३-२४ साठी तेल्हारा तालुक्यातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींची जि.प.प्रशासनाने केली निवड.

महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने १
मे रोजी पालकमंत्री आकाश फुंडकर आमदार रणधीर सावरकर, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत गाडेगाव ग्रामपंचायतीचा सन्मान करण्यात आला.
पूर्वीची स्मार्ट ग्राम योजना आता यापुढे आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजना म्हणून रूपांतरित झाली आहे. सन २०२३-२४ मध्ये तेल्हारा तालुक्यात गाडेगाव ग्रामपंचायतीची तालुका सुंदर ग्राम म्हणून प्रथम क्रमांक मिळविला आहे. महाराष्ट्र दिनाच्या औचित्याने १ मे रोजी जिल्हा क्रिडा संकुल अकोला येथे पालकमंत्री आकाश फुंडकर, आमदार रणधिर सावरकर तसेच जिल्हाधिकारी अजित कुंभार , जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत पालकमंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते गाडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ.शिलाताई प्रमोद वाकोडे,प्रमोद वाकोडे ग्रामविकस अधिकारी कु वनमाला करवते, विस्तार अधिकारी ठोंबरे साहेब यांनी हा पुरस्कार स्विकारला आहे.
या १० लाख रुपयांचे रोख पारितोषिक व पुरस्कार हा ग्राम वैभवात भर टाकणारा आहे.
सरपंच सौ शिला प्रमोद वकोडे यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेकाविध विकास निधी मिळवून दिला. याशिवाय स्वच्छता अभियान, घरकुल सह ईतर चांगल्या दर्जाचे विकास कामे करून घेतली. विशेषतः गावातील विकासकामे, व लाभार्थी निवड प्रक्रिया बाबत वेळोवेळी ग्रामसभा घेऊन सर्वानुमते निर्णय घेण्याची उत्तम परंपरा येथे कार्यान्वित आहे. या सर्व कामकाजाची दखल घेऊन ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या आर. आर. (आबा) पाटील सुंदर ग्राम पुरस्कार योजनेंतर्गत २०२३-२४ साठी तेल्हारा तालुक्यातून प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे.