आपला जिल्हा अकोलाधार्मिक

कुणबी युवक संघटनेच्या वतीने तेल्हारा येथे संत तुकाराम महाराज जयंती उत्सव साजरा. संत तुकाराम महाराजांनीच शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी केली – ह.भ.प. शिवलीलाताई पाटील

कुणबी युवक संघटनेच्या वतीने तेल्हारा येथे संत तुकाराम महाराज जयंती उत्सव साजरा. संत तुकाराम महाराजांनीच शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी केली – ह.भ.प. शिवलीलाताई पाटील

कुणबी युवक संघटनेच्या वतीने तेल्हारा येथे संत तुकाराम महाराज जयंती उत्सव साजरा. संत तुकाराम महाराजांनीच शेतकऱ्यांची पहिली कर्जमाफी केली – ह.भ.प. शिवलीलाताई पाटील. 

तेल्हारा दि :- कुणबी युवक संघटनेच्या वतीने तेल्हारा येथे संत तुकाराम महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संत तुकाराम महाराज चौकात आयोजित कीर्तनात ह.भ.प. शिवलीलाताई पाटील यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवनचरित्रावर सखोल विवेचन केले. “सर्वप्रथम शेतकऱ्यांची कर्जमाफी संत तुकाराम महाराजांनीच केली,” असे ठाम प्रतिपादन त्यांनी आपल्या कीर्तनातून केले.

         संत तुकाराम महाराजांनी मानवी मूल्ये, समता, करुणा आणि सामाजिक न्याय यांचा संदेश दिला. शेतकरी, कष्टकरी आणि वंचितांच्या दुःखावर फुंकर घालत त्यांनी अन्यायाविरोधात उभे राहण्याची प्रेरणा दिली, असे सांगत शिवलीलाताई पाटील यांनी अभंगांच्या माध्यमातून तुकाराम महाराजांचा समाजसुधारक दृष्टिकोन उलगडून दाखवला. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना माणुसकीची आणि न्यायाची वाट दाखवणारा तुकाराम महाराजांचा वारसा आजही मार्गदर्शक आहे, असे त्यांनी नमूद केले.

संत तुकाराम महाराज जयंती उत्सव निमित्त संत तुकाराम महाराज चौकामध्ये सकाळी स्वच्छता अभियान करण्यात आले व 11 ला आरती झाल्यानंतर बारा वाजता रक्तदान शिबिर घेण्यात आले .सायंकाळी ६ वाजता माऊली संगीत क्लासच्या वतीने भारतीय सध्याचा कार्यक्रम घेण्यात आला रात्री साडेसात वाजता हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कीर्तनामध्ये टाडकरी मंडळीचे मोलाचे सहकार्य लाभले. तत्पूर्वी तेल्हारा नगरपालिकेच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष व सर्व पालिका सदस्यांचा कुणबी युवक संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ह भ प गाडेकर महाराज, न.प. मुख्याधिकारी सतीश गावंडे व पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्तावित उज्वल दबळघाव व टिकार मॅडम यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कुणबी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष श्याम गावंडे, शहर अध्यक्ष वैभव तायडे, महिला संघटना तालुका अध्यक्ष सुमनताई कोठे, शहराध्यक्ष आरतीताई गायकवाड संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले. 

कार्यक्रमास कुणबी युवक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!