श्याम पाठक सरांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.
English speaking course with basic grammar
श्याम पाठक सरांच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.
अकोला – दि.
अकोला येथे श्याम पाठक सरांच्या *English speaking course with basic grammar* या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा दि. 23 फेब्रुवारी ला उत्साही वातावरणात पार पडला.

या पुस्तकाचे प्रकाशन रतनसिंग पवार साहेब (शिक्षणाधिकारी प्राथ. जि. प. अकोला),राजेश खुमकर (गटविकास अधिकारी), दिनेश दुतंडे (गटशिक्षणाधिकारी), प्रा.डॉ. ऍड.दीपक दामोदरे ,प्रा. सज्जाद अहेमद , प्रा.निलेश मुरूमकर, गोपाल मुकुंद , ज्ञानांकुर प्रकाशन जिल्हा अमरावती चे संचालक ज्ञानेश्वर सोनटक्के यांचे उपस्थितीत व शुभहस्ते संपन्न झाले.
“शालेय कार्य प्रामाणिकपणे पार पाडून श्याम पाठक सरांनी विद्यार्थ्यांकरिता केलेले पुस्तक निर्मितीचे कार्य हे उल्लेखनीय असून अभिमानास्पद आहे” असे कौतुकास्पद उद्गार रतनसिंग पवार साहेब यांनी यावेळी काढले. तसेच पुस्तकाचा सोपा व उपयुक्त आशय, बोली भाषेतून केलेले सादरीकरण विद्यार्थी व पालकांना निश्चितच उपयुक्त व दिशादर्शक ठरेल. तसेच इंग्रजी भाषेचे महत्त्व याविषयी सर्व पाहुण्यांनी आपले अत्यंत महत्त्वपूर्ण विचार याप्रसंगी व्यक्त केले.
याप्रसंगी मनब्दा SMC अध्यक्ष विश्वास पाथ्रीकर, मुख्याध्यापक राजेश चित्ते ,देवमन रौंदळे , विजय टोहरे , शशिकांत गायकवाड , गोपाल सुरे ,निलेश काळे, प्रमोद उपाध्ये , प्रकाश चतरकर , रजनीश ठाकरे , शंकर तायडे , देवानंद मोरे , प्रमोद काळपांडे , मारोती वरोकार , अविनाश आगाशे ,शंकर डाबेराव ,सुरेश बंड , संघर्ष सावरकर , प्रशांत भारसाकळे , राजेश देशमुख , महेंद्र भगत , दुपारे सर, प्रवीण डेरे , किशोर कोल्हे , शाम कुलट , सचिन काठोळे , वसिमोद्दीन सर ,मंगेश पाथ्रीकर , प्रमोद बगले , गोपाल दातकर , अजय पाटील इत्यादी शिक्षक मित्रमंडळी उपस्थित होती.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सचिन भोयर यांनी, प्रास्ताविक दिलीप राठोड यांनी, कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रवीण पेटे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तेल्हारा शिक्षक मित्र मंडळीचे राजेश मुकुंदे , आशिष सदाफळे , निलेश तलवारे , पवन काळबांडे ,विजय वाकोडे , दिगंबर खडसे अकोट,पांडुरंग डाबेराव , सुताळे , अमित चव्हाण , माधव केंद्रे , प्रवीण चिंचोळकर यांनी परिश्रम घेतले.