
तळेगाव बाजार येथे महाशिवरात्री उत्सव व यात्रा.
तळेगाव बाजार-
तेल्हारा तालुक्यातील तळेगाव बाजार येथे महाशिवरात्री उत्सव सुरू झाला असुन अनेक भाविक शिवपुराण कथेचा लाभ घेत आहेत. दरवर्षी प्रमाणे यंदाही तळेगाव बाजार येथील सोमेश्वर मंदिर परिसरात महाशिवरात्री निमित्त भागवत सप्ताह व शिवपुराण कथा सुरू आहे. दि 26 फेबुवारी रोजी महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे. या निमित्ताने बाहेर गावाहून येणाऱ्या भाविकांना फराळ व्यवस्था करण्यात येईल तर 28 फेबृवारी रोजी भव्य यात्रा उत्सव पार पडत असुन या दिवशी गावातुन रथयात्रा व सायंकाळी महाआरती व नंतर भाविकांना महाप्रसाद राहील तरी भाविकांनी या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन सोमेश्वर संस्थान व गावकरी यांनी केले आहे.