लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी.
श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा

तेल्हारा येथील श्री शिवाजी हायस्कूल येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हि डि गावंडे मुख्याध्यापक हे होते तर विशेष अतिथी म्हणून सुधीर बापू देशमुख शाळा समिती सदस्य,प्रमुख अतिथी प्रेरणाताई कराळे शिक्षक प्रतिनिधी, गजानन गावंडे शिक्षकेतर कर्मचारी, वर्ग प्रतिनिधी शांतीकुमार सावरकर उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील वंजारी यांनी केले. यावेळी सुधीर बापू देशमुख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. जयंती उत्सव साजरा होण्याकरीता बळीराम कुवारे,तुषार जाधव, बी जी पवार, भारतभोयर, धनंजय भंगाळे, कु नंदाने मॅडम, अभिजितहिगणकर, विजय दहे यांनी परिश्रम घेतले. यावेळी मान्यवरांनी लोक शाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित विचार व्यक्त केले.