सेठ बन्सीधर झुनझुनवाला यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि पुण्यतिथी उत्सव दिमाखात.
शताब्दी महोत्सवात प्रेरणादायी अध्याय.
सेठ बन्सीधर झुनझुनवाला यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि पुण्यतिथी उत्सव दिमाखात.
शताब्दी महोत्सवात प्रेरणादायी अध्याय.

तेल्हारा
ग्रामीण भागात शिक्षणाचा वटवृक्ष रोवणाऱ्या सेठ बन्सीधर दहिगावकर एज्युकेशन सोसायटीसाठी आजचा दिवस गौरवाचा ठरला. तेल्हारा येथील शेठ बन्सीधर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त, संस्थेचे संस्थापक स्वर्गीय सेठ बन्सीधर झुनझुनवाला यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या पुतळ्याचे अनावरण आज दिनांक 29 जुलै रोजी अतिशय भावपूर्ण वातावरणात करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात लेझीम व घोष पथकाच्या वादनाने पाहुण्यांचे स्वागत करून झाली. या पारंपरिक वाद्यांच्या गजरात शाळेच्या मैदानात उत्सवमय वातावरण निर्माण झाले.यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन सुरेश झुनझुनवाला (वर्धा) यांच्या हस्ते पार पडले. संस्थापकांच्या प्रतिमेचा वैदिक पद्धतीने जलाभिषेक करण्यात आला.
मुख्य कार्यक्रमात स्वर्गीय बन्सीधर झुनझुनवाला यांच्या पुतळ्याचे अनावरण मंगतराय तोदी (बिलासपूर) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या क्षणी आकाशात फटाक्यांची आतिषबाजी व पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उभं राहून श्रद्धांजली अर्पण केली.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंगतराय तोदी (नातू, बिलासपूर), सत्यनारायण अग्रवाल (भुरूच), शरदचंद्र अग्रवाल (धामणगाव), मुकुंद नरेडी (परतवाडा) यांची उपस्थिती होती. याशिवाय आकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश भारसाकळे, अमित अग्रवाल, विजय कौशल यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली.
मंगतरायजी तोदी यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष गोपालदास मल्ल यांनी सपत्नीक केले.
सत्यनारायण अग्रवाल यांचे स्वागत विठ्ठलराव खारोडे,
शरद अग्रवाल यांचे स्वागत अश्विनीताई खारोडे व अनिल अग्रवाल,बेनिप्रसाद झुनझुनवाला यांचे स्वागत राजेंद्र कोरडे यांनी केले.

कार्यक्रमात प्रेरणादायी भाषणेही झाली.
मंगतराय तोदी यांनी आपल्या भाषणात आजोबांच्या कार्याचा गौरव करत संस्थेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
आमदार प्रकाश भारसाकळे यांनी संस्थेच्या सामाजिक योगदानाचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
अमित अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल, शरद अग्रवाल, विजय झुनझुनवाला, माजी अध्यक्ष राजेंद्र शाह यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.
शताब्दी महोत्सव समितीचे सदस्य आशिष झुनझुनवाला यांनी अध्यक्ष व संचालक मंडळाचे आभार मानले आणि या स्मारकाचे महत्त्व स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषण गोपालदास मल्ल,प्रास्ताविक विठ्ठलराव खारोडे,सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक मुकुंद सोनीकर,आभार प्रदर्शन प्रदीप राऊत यांनी केले.
या वेळी दहिगाव गावातील प्रतिष्ठित नागरिक अरविंद अवताडे, जगन्नाथ बोरसे, ज्ञानदेवराव घंगाळ, प्रशांत अवताडे, वासुदेवराव महाले यांनी पुतळ्याला हार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमा दरम्यान झुनझुनवाला परिवाराचे तथा त्यांच्या नातेवाईकांचे सन्मानचिन्ह देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. या सत्काराने उपस्थितांचे मन भारावून गेले.

कार्यक्रमानंतर झुनझुनवाला परिवाराच्या वतीने तीनही विभागांतील 6000 विद्यार्थ्यांना, शिक्षकवृंद व निमंत्रितांना स्नेहभोजन देण्यात आले.
विशेष म्हणजे बेनिप्रसाद झुनझुनवाला व त्यांच्या कुटुंबीयांनी लेझीम पथकात सहभागी होऊन उत्सवात सहभाग घेतला, हे दृश्य सर्वांना भावून गेले.
डॉ. विक्रम जोशी, शिवम पाडिया, ओमप्रकाश झुनझुनवाला, विष्णू मल्ल, अश्विनीताई खारोडे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रेरणादायी पुतळ्याचे अनावरण हे केवळ औपचारिक कार्य नव्हते, तर संस्थेच्या मूल्यांचा, संस्कारांचा आणि कार्याचा गौरव करणारे स्मारक होते, असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले.
शताब्दी वर्षात संस्थापकांच्या स्मृतीला अजरामर करणारा हा दिवस तेल्हारा परिसरासाठी ऐतिहासिक ठरला, हे निश्चित!