आपला जिल्हा अकोलाधार्मिक

श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. 

उत्सव संस्कृतीवर्धक असावे - श्री.शिवा महाराज बावस्कर.

श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन. 

उत्सव संस्कृतीवर्धक असावे – श्री.शिवा महाराज बावस्कर.

      अति पुरातन असणाऱ्या भारतीय संस्कृतीमध्ये रुढी , परंपरा व उत्सव यांना अनन्यसाधारण महत्त्व असून ; या त्रयींच्या निर्मिती मागे निर्मात्यांचे पुढील पिढीला संयम , सदाचार व संस्कार देऊन, आत्मोन्नती , समाजोन्नती व राष्ट्रोन्नती व्हावी हे प्रामाणिक तीन उद्देशही होते. म्हणूनच अनादी कालपासून चालत आलेल्या या संस्कृतीने त्या तिन्ही गोष्टींचे अत्यंत जिवापाड प्रेम करून संचलन , संरक्षण आणि संवर्धनही केले. आज मात्र रुढी ह्या केवळ औपचारिकते पुरत्या शिल्लक राहिल्या असून; परंपरा तर नुसत्या प्रतिष्ठा व प्रदर्शनाकरिता करिता सांभाळल्या जात आहेत. उत्सवामध्ये उत्साह वाढविण्यासाठी धार्मिकतेच्या गोंडस नावाखाली विकृतीची घुसखोरी होते आहे. वास्तविक पाहता उत्सव हे संस्कृती वर्धनाकरिता साजरे केले जावे विकृतीच्या वृद्धीसाठी नाही. असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध विनोदी कीर्तनकार श्री शिवा महाराज बावस्कर यांनी केले.

   ते आज श्री संत वासुदेवजी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे आयोजित श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिरातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.ते पुढे म्हणाले की,आज मात्र गणेशोत्सव , नवरात्रोत्सव व विविध अवतारादिकांच्या व थोर महापुरुषांच्या जयंती उत्सवाच्या नावाखाली काढल्या जाणाऱ्या शोभायात्रा , लग्न प्रसंगातील वराती व रंगमंचावर सादर केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून शाळा व महाविद्यालयांमध्ये सुद्धा संस्कृतीपेक्षा विकृतीचेच प्रदर्शन होताना दिसून येते आहे. एवढेच नाही तर , उत्तर हिंदुस्तानातील लोन आपल्याकडे आल्यामुळे सदृश्य कथा सुद्धा या गोष्टीस बरीच भर घालत आहेत. किंबहुना उपरोक्त गोष्टी निर्व्यसनी असणाऱ्या तरुण पिढीला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली व्यसनी बनवून , राजरोसपणे व्यसन करण्याचा अधिकृत परवाना प्राप्त करून देणाऱ्या कार्यशाळाच ठरत आहेत. वास्तविक पाहता उत्सव या शब्दाचा अर्थ उत् नाम परमात्मा आणि त्सव म्हणजे प्रगटीकरण अर्थातच परमात्म्याच्या विशेषत्वानी प्रगटीकरणाला उत्सव म्हटल्या जाते. आज मात्र प्रत्येक ठिकाणी उत्सवात व्यसनाधीनतेच्या उत येऊन त्या ठिकाणी देवा ऐवजी दानवांचेच प्रगटीकरण होते. हे संस्कृती रक्षणाच्या दृष्टिकोनातून धोक्याची घंटा आहे.

    खा. बळवंतराव वानखडे यांनी केली आश्वासनाची पूर्तता. –

     अमरावती लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार अंजनगाव दर्यापूर मतदारसंघाचे आमदार असतांना माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराला भेट देण्याकरता आले असता त्यांनी शिबिरार्थ्यांकरीता थंड पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून वॉटर कुलर देण्याचे कबूल केले होते. त्या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केल्यामुळे विद्यार्थी आणि व्यवस्थापना मध्ये अत्यंत उत्साही वातावरण निर्माण झाल्याचे ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!