महाराष्ट्र

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील मुळचे पाथर्डी येथील प्रख्यात पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील मुळचे पाथर्डी येथील प्रख्यात पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन.

अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील मुळचे पाथर्डी येथील प्रख्यात पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे निधन.

अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील ग्राम पाथर्डीचे मूळनिवासी, प्रखर विचारवंत आणि पत्रकारितेतील ज्येष्ठ, अभ्यासू व निस्पृह व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित असलेले ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मणराव जोशी यांचे मंगळवारी (दि. २८) दुपारी २ वाजता देवनगर येथील सत्यम हॉस्पिटल येथे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८९ वर्षे होते. पत्रकारितेतील आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी सुरुवातीला ‘तरुण भारत’ या दैनिकात पत्रकार म्हणून कार्य केले. त्यानंतर काही काळ गोव्यात पत्रकारिता केल्यानंतर ते पुन्हा नागपूरला परतले आणि ‘तरुण भारत’ मध्ये कार्यरत राहिले. पुढे त्यांनी ‘लोकशाही वार्ता’ या वृत्तपत्रात संपादक म्हणून उल्लेखनीय कामगिरी बजावत पत्रकारितेतील प्रामाणिकपणा, निर्भीड लेखन आणि सामाजिक बांधिलकीची परंपरा जपली.

त्यांच्या लेखणीने अनेक सामाजिक विषयांना प्रभावीपणे वाचा फोडली तसेच नवोदित पत्रकारांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांच्या पश्चात दोन मुली असा परिवार आहे. अन्त्य यात्रा बुधवार, दि. २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता, सहकार नगर, १७९, कुकुराज अपार्टमेंट येथील निवासस्थानावरून निघणार असून सहकार नगर घाट येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. लक्ष्मणराव जोशी यांच्या निधनामुळे पत्रकारिता क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.

मराठी पत्रकारितेला वैचारिक अधिष्ठान देणारे, अभ्यासपूर्ण लेखन, मूल्यनिष्ठ पत्रकारिता आणि माध्यम अनुशासनाचा आदर्श घालून देणारे लक्ष्मणराव जोशी हे पत्रकारितेतील एक उंच शिखर होते. त्यांची अभ्यासू वृत्ती, संतुलित विचार, विलक्षण विनयशीलता आणि सतत विद्यार्थी म्हणून जगण्याची जिज्ञासा हे त्यांचे व्यक्तिमत्त्व अधिक उंचावणारे गुण होते.त्यांनी आपल्या लेखणीच्या सामर्थ्याने समाजमन घडविण्याचे कार्य केले, तर असंख्य तरुण पत्रकारांना मार्गदर्शन करून पत्रकारितेची सशक्त पिढी घडविली.विचारांशी प्रामाणिक राहून समाजहिताला प्राधान्य देणाऱ्या त्यांच्या कार्याची मराठी पत्रकारिता कायम ऋणी राहील. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी येथील मूळनिवासी लक्ष्मणराव जोशी यांचे प्राथमिक शिक्षण सेठ बन्सीधर विद्यालय तेल्हारा येथे झाले होते. विद्यालयाच्या शतकपुर्ती सोहळ्यात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता तसेच दरम्यान तेल्हारा येथील स्वा.वि.दा.सावरकर स्मरणिक प्रकाशनार्थ सोहळ्यात सुद्धा तेल्हारा तालुक्यातील सुपुत्र म्हणून गौरवण्यात आले होते. 

आदरणीय लक्ष्मणराव जोशी यांना पत्रकारितेत आणि व्यक्ति कर्तुत्वासाठी प्रतिष्ठेचा मानला जाणारा पांचजन्य पुरस्कार तत्कालीन पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपयी त्यांच्या हस्ते तर महाराष्ट्र शासनाचा बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मिळाला आहे. असे दोन्ही पुरस्कार मिळवणारी तेल्हारा तालुक्यातील एकमेव व्यक्ती होते. 

त्यांच्या निधनाने मराठी पत्रकारिता, वैचारिक विश्व आणि राष्ट्रीय विचार परिवाराची मोठी हानी झाली आहे. ही पोकळी सहज भरून निघणारी नाही…ईश्वर दिवंगत पुण्यात्म्यास आपल्या श्रीचरणी स्थान देवो…भावपूर्ण श्रद्धांजली!

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!