पंचगव्हाण उबारखेड येथे 69 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा.
पंचगव्हाण उबारखेड येथे 69 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा.
पंचगव्हाण उबारखेड येथे 69 वा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा.

तेल्हारा तालुक्यातील पंचगव्हाण उबारखेड येथे 69 वा धम्मचक्र परिवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
त्रिरत्न बुद्ध विहार उबारखेड येथून मिरवणूक ची सुरवात करण्यात आली. मिरवणूक बस स्टॅन्ड चौक, जुने उबारखेड,गांधी चौक, हनुमान मंदिर, दुर्गा माता मंदिर ,ग्रामपंचायत कार्यालय, पोलीस चौकी, आप्पास्वामी मठ, चांद सावली बाबा ,परत बस स्टॅन्ड चौक ,विश्वशांती बौद्ध विहार या मार्गाने शांततेत काढण्यात आली. मिरवणुकी मधे धम्म शाळेचे विघार्थी, उबारखेड येथील बौद्ध उपासक व उपासीका, खेलदेशपांडे, उबारखेड, नरसीपुर, खाकटा येथील बौद्ध उपासक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकी मधे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस ठीक ठीकाणी हारार्पण करण्यात आले. मिरवणुकीची सांगता विश्वशांती बौद्ध विहार उबारखेड येथे त्रिसरण सह पंचशील घेऊन करण्यात आली. यावेळेस तेल्हारा पोलीस स्टेशन ठाणेदार यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.