सेठ बन्सीधर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाला दिपावली पर्वाचे स्वरूप.
विविध कार्यक्रमांच्या मंदीयाळीत १०० वर्षांच्या आठवणींला उजाळा.
सेठ बन्सीधर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाला दिपावली पर्वाचे स्वरूप.
- विविध कार्यक्रमांच्या मंदीयाळीत १०० वर्षांच्या आठवणींला उजाळा.

सेठ बन्सीधर विद्यालय शताब्दी महोत्सव अंतर्गत चवथ्या पुष्पात शुक्रवार दि.२१ मार्च ते २३ मार्च पर्यंतच्या विविध आयोजित कार्यक्रमात १०० शंभरी घाठलेल्या माजी विद्यार्थी पासून ते २०२५ पर्यंत च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा जणू दिपावली पर्वात आलेल्या माहेरवाशीनीच्या भेटीगाठीत सेठ बन्सीधर विद्यालयाच्या शताब्दी महोत्सवाला दिपावली पर्वाचे स्वरूप दिसून येत आहे. यामुळे विविध कार्यक्रमांच्या मंदीयाळीत विद्यार्थी व गुरुजी यांच्या विद्यालयातील १०० वर्षांच्या आठवणींला उजाळा मिळाला कित्येकांना आपल्या मनोगतात भावनांना आवर घालणे अशक्य झाले. शालेय जीवनात घडलेले सुखदुःख मनोगतात व्यक्त केले गेले.

दिनांक २१ मार्चला ८० वर्षावरील माजी विद्यार्थी व तेल्हारा तालुक्यातील आजी माजी सैनिक तसेच शहरातील मान्यवर पत्रकार, निमंत्रित मान्यवरांचा शिक्षण संस्थेतर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.

सत्कार समारंभा पूर्वी शाळेच्या प्रांगणातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे मान्यवरांच्या हस्ते पूजन व हारार्पण तसेच प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्या समोरील खुल्या सभागृहात भरविण्यात आलेल्या २००० देशभक्त क्रांतिकारकांच्या छायाचित्रांचे प्रदर्शनाचे फीत कापून उद्घाटन करण्यात आले .सदर प्रदर्शन कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांनी सादर केले होते ” ओळख देशभक्तांची, शाळा तेथे क्रांती मंदिर “अभियाना अंतर्गत ट्रस्ट चे विश्वस्त देशभक्त कोषकार चंद्रकांत शांताराम शहासने यांनी हे प्रदर्शन प्रदर्शित केले होत. तसेच ऐतिहासिक पुरातन शस्त्रास्त्र व वस्तू, प्राचीन नाणी यांचे प्रदर्शनाचे उद्घाटनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रदर्शनाचे संकलनकर्ते देशमुख गुरुजी भांबेरी हे होते .सेठ बन्सीधर विद्यालयातील घोष पथकातील विद्यार्थ्यांनी आलेल्या मान्यवरांचे घोषाचे तालावर स्वागत केले व विद्यार्थिनींनी औक्षण केले.

स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या समोरील खुल्या सभागृहात मुख्य समारंभाच्या अध्यक्षस्थानी सेठ बन्सीधर दहिगावकर हायस्कूल एज्युकेशन सोसायटी तेल्हाराचे विद्यमान अध्यक्ष गोपालदास मल्ल होते. तर व्यासपीठावर संस्थेचे उपाध्यक्ष विलासराव जोशी, माजी अध्यक्ष राजेंद्र कुमार शाह, कॅप्टन स्नेहल पोटे, अकोला येथील निवृत्त मुख्याध्यापिका तथा विद्याभारतीच्या कार्यकर्त्या ताराताई हातवळणे, विद्याभारतीचे अकोला महानगर अध्यक्ष मंगेश वानखडे, प्रांताध्यक्ष सचिन जोशी, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार जवकार इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रारंभी देवी सरस्वती, सेठ बन्सीधर झुनझुनवाला, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पूजन, दीप प्रज्वलन व हार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी ८० वर्षावरील माजी विद्यार्थी, आजी-माजी सैनिक, विशेष आमंत्रित व पत्रकार अशा मान्यवरांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह प्रदान करून यथोचित सत्कार करण्यात आला आहे.

याप्रसंगी संस्थेचे माजी अध्यक्ष राजेंद्रकुमार शाह यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या शंभर वर्षांच्या इतिहासातील प्रसंगाचा घडलेल्या घटनांचा ऊहापोह करून विस्तृत माहिती दिली व संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीचा इतिहास कथन केला. तर आजी-माजी सैनिक संघटनेचे पांडुरंग खूमकर, कर्णिक मॅडम यांनी मनोगतातून संस्थेच्या प्रगतीची प्रशंसा केली. अध्यक्षीय भाषणातून संस्थाध्यक्ष गोपालदास मल्ल यांनी कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद व प्रगटलेला उत्साह पाहून आनंद व्यक्त केला व उपस्थितांचे मनःपूर्वक आभार मानले.

कार्यक्रमास संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे व्यवस्थापक विठ्ठलराव खारोडे, संचालक डॉक्टर विक्रम जोशी, अश्विनीताई खारोडे, विष्णू मल्ल, पुष्कर तागडे, ओमप्रकाश झुनझुनवाला, माजी प्राचार्य मनोहरराव राऊत, माजी मुख्याध्यापक वासुदेवराव नळकांडे, विठ्ठलराव सदाफळे, विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य गोपाल फाफट, स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या रंजना भागवत, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक आशिष अग्रवाल, शाळेचे प्रथम मुख्याध्यापक स्वर्गीय त्र्यंबकराव वामनराव उर्फ तात्यासाहेब संत यांचे चिरंजीव अनुक्रमे रमेश संत, मुकुंद संत, मधुकर संत, बल्लाळ संत तसेच गुलाबराव मारोडे, लक्ष्मीनारायण भुतडा, भरणे साहेब, शामशील भोपळे,मेष्टा पदाधिकारी यांच्यासह निमंत्रितांची उपस्थिती होती.
प्राथमिक विभागातील स्काऊट पथकातील विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन केले. मंचासमोर १०० दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाच्या प्राचार्या रंजना भागवत व प्राथमिक विभागातील ज्येष्ठ शिक्षिका सुनिता कुंडलवाल यांनी केले.
सेठ बन्सीधर विद्यालयाचे प्रथम दिवंगत मुख्याध्यापक स्वर्गीय त्रंबकराव वामनराव उर्फ तात्यासाहेब संत यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कुटुंबीयांनी इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत संस्कृत अथवा मराठी विषयात शाळेतून सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस जाहीर केले व एक लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द केला. सदर रकमेच्या व्याजातून हे बक्षीस दिले जाईल. तर लक्ष्मीनारायण भुतडा यांचेकडून ७२ हजार रुपयाचा धनादेश संस्थेला प्रदान करण्यात आला सदर रकमेच्या व्याजातून इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत शाळेतून गणित विषयात सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थिनीस हे बक्षीस स्वर्गीय राम गोपाल कस्तुरचंजी भुतडा यांचे नावाने दिले जाईल असे यावेळी जाहीर करण्यात आले.

माजी सैनिक श्रीराम पाऊलझगडे, योगिता पाऊलझगडे यांनी गायलेल्या देशभक्तीपर गीताने समारंभाची सांगता झाली. आभार प्रदर्शन आशिष अग्रवाल यांनी केले.