अखेर तेल्हारा शहरातील दोन्ही उपोषणाची सांगता. शहरा अंतर्गत विविध मागण्यासाठी सुरू होते उपोषण.
अखेर तेल्हारा शहरातील दोन्ही उपोषणाची सांगता. शहरा अंतर्गत विविध मागण्यासाठी सुरू होते उपोषण.
अखेर तेल्हारा शहरातील दोन्ही उपोषणाची सांगता.
शहरा अंतर्गत विविध मागण्यासाठी सुरू होते उपोषण.

तेल्हारा नगरपरिषद कार्यालयासमोर ५ दिवसांपासून विविध मागण्यासंदर्भात बेमुदत उपोषणास बसलेले नरेंद्र गोकुलचंद सुईवाल यांचे पाचव्या दिवशी जिल्हा सह आयुक्त न पा प्र अकोला, जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांचे पत्र मुख्याधिकारी नगरपरिषद तेल्हारा यांचे मार्फत प्राप्त झाल्याने व संबंधित बाबींवर चर्चा करण्या करिता सभा लावण्यात येईल असे जिल्हा सह आयुक्त. न पा प्र जिल्हाधिकारी कार्यालय अकोला डॉ नरेंद्र बेंबरे यांच्या सहीचे पत्र आणि त्यावर तेल्हारा नगरपरिषद च्या वतीने बांधकाम अभियंता आकाश वाघ यांच्या हस्ते सरबत देऊन सुईवाल यांचे उपोषण सुटले. तक्रारीबाबत नियमानुसार योग्य ती कार्यवाही करून उपोषणकर्त्याला उपोषणापासून परावृत्त करणे बाबत मुख्या धिकार्यांना दिलेल्या पत्रात जिल्हाधिकारी कार्यालय अकोला यांचे कडून प्राप्त पत्रात नमूद आहे. तसेच आपल्या नगरपरिषद कार्यालया समोरील उपोषणाकरिता बसलेले नरेंद्र सुईवाल रा. वृंदावन कॉलनी तेल्हारा यांना उपोषण सोडविण्याच्या अनुषंगाने सदर मुद्यांबाबत आपण व संबंधित कर्मचारी यांनी विस्तृत अहवाल सादर करावा व तदनंतर संबंधित बाबीवर चर्चा करण्याकरिता सभा लावण्यात येईल याबाबत कळवावे. असे सदर पत्रात नमूद करण्यात आले आहे. सदर पत्र १२सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.२० वाजे दरम्यान उपोषणकर्त्यांस सादर करण्यात आले होते. यावेळी तेल्हारा न प बांधकाम अभियंता आकाश वाघ, कार्यालय अधीक्षक निषाद वानखडे, कर अधीक्षक देशमुख तथा न प कर्मचारी, तेल्हारा पोलीस स्टेशन तर्फे हेड कॉन्स्टेबल प्रशांत बानेरकर सह शहरातील सामाजिक कार्यकर्ते नागरिकांच्या उपस्थितीत उपोषण सोडण्यात आले.

स्वराज्य पक्षाचे गणेश आमले यांच्यासह सहकाऱ्यांनी तेल्हारा शहरातील प्रलंबित प्रश्नांवर सुरू केलेल्या उपोषणाची सायंकाळी सांगता करण्यात आली. नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांसोबत स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर व प्रमुख पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत चर्चेअंती काही मागण्यांवर तातडीने कार्यवाही सुरू करण्यात आली, तर काही मागण्यांसाठी नगरपरिषदेने वेळ मागितला आहे. उपोषणकर्त्यांना लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर गणेश आमले यांनी उपोषण मागे घेतले.शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्नांवर स्वराज्य पक्षाने हे आंदोलन छेडले होते. उपोषणादरम्यान नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा करून प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी ठोस पावले उचलण्याचे आश्वासन दिले. यानंतर उपोषणाची सांगता झाली.
यावेळी नगरपरिषद नगर अभियंता आकाश वाघ, शशिकांत खाडे,पोलिस विभागाचे राजू इंगळे. स्वराज्य पक्षाचे प्रतिक पाथ्रिकर,अक्षय भुजबले,गोपाल खळसान,मयुर राऊत,शाम मोहे,सचिन गोरे,प्रज्वल लव्हाळे,पिंटु अंजनकार,राम सुरवार यांचेसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.