शिवसेनेच्या वतीने जनसुरक्षा कायद्याविरोधात तेल्हारा येथे निषेध आंदोलन.
शिवसेनेच्या वतीने जनसुरक्षा कायद्याविरोधात तेल्हारा येथे निषेध आंदोलन.
शिवसेनेच्या वतीने जनसुरक्षा कायद्याविरोधात तेल्हारा येथे निषेध आंदोलन.

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तेल्हारा येथे राज्य सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आले नुकताच राज्य सरकारच्या वतीने जनसुरक्षा विधेयक कायदा पारित करण्यात आले त्यामुळे भारतीय लोकशाही धोक्यात आली असून हे विधेयक घटनाविरोधी,जनविरोधी कायदा अमलात आणला असून लोकशाही हक्क नाकारणारा जनसुरक्षा कायदा रद्द करण्यासाठी शिवसेना तेल्हारा तालुक्याच्या वतीने स्थानिक टॉवर चौक,तेल्हारा येथे निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनात तालुकाप्रमुख अजय गावंडे,शिवसेना शहरप्रमुख विवेक खारोडे,माजी शहरप्रमुख राजेश वानखडे, समन्वयक गजानन मोरखडे,प्रवक्ते सचिन थाटे,शेतकरी सेना उपजिल्हाप्रमुख गोपाल विखे,उपशहरप्रमुख गौतम दामोदर,मनीष गवळी,सुधाकर गावंडे, युवासेना तालुकाप्रमुख वैभव गावंडे,पंकज कवर,अतुल घंगाळ,संतोष साबळे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.