युवकांनी व्यसनाला पुर्णविराम देऊन स्वतंत्र उद्योगाचा श्री गणेशा करा – संदिपपाल महाराज.
प्रशांत डिक्कर मित्र परिवार आणि शेगाव नाका मित्र परिवार चा उपक्रम.
युवकांनी व्यसनाला पुर्णविराम देऊन स्वतंत्र उद्योगाचा श्री गणेशा करा – संदिपपाल महाराज.
प्रशांत डिक्कर मित्र परिवार आणि शेगाव नाका मित्र परिवार चा उपक्रम.

शेगाव नाका तेल्हारा येथील उंबरकर कॉम्प्लेक्समधे प्रशांत डिक्कर मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून आणि शेगाव नाका मित्र परिवार यांच्या सहकार्याने सप्तखंजिरी वादक संदिपपाल महाराज यांचा ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रबोधनात्मक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाला तालुक्यातील अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संदिपपाल महाराज यांचा सत्कार करुन करण्यात आला. त्यानंतर संदिपपाल महाराज यांनी आपल्या सुमधुर सप्तखंजिरी वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले आणि प्रबोधनात्मक संदेशाद्वारे सकारात्मक प्रभाव टाकला. युवकांनी व्यसानाला पुर्णविराम द्या. आणि स्वतंत्र उद्योगाचा श्री गणेशा करा असे किर्तनातुन महाराज यांनी संदेश दिला. कार्यक्रमादरम्यान, संदिपपाल महाराज यांच्या विनंतीवरून प्रशांत डिक्कर यांनी शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नांवर आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी बच्चुभाऊ कडु यांनी २८ ऑक्टोबर रोजी मंत्रालयावर आपल्या न्याय हक्कासाठी पुकारलेल्या आंदोलनात लाखोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
प्रशांत डिक्कर मित्र परिवार आणि शेगाव नाका मित्र परिवार यांच्या या उपक्रमाचे तेल्हारा शहरात सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमाने सामाजिक एकता आणि सांस्कृतिक जागृतीला चालना देत एक नवा आदर्श निर्माण केला.
यावेळी अनिल तायडे, संजय रोहनकार, क्रांतीकुमार टोहरे,रामदादा फाटकर,सोनु मलिये, गोपाळ पाटील (मेहकर) राजेश वानखडे,संदिप फाटकर, रामेश्वर हागे, आशिष शेळके, दत्ता थारकर, चंद्रकांत मोरे, शाहीर लोणाग्रे महाराज, रमेश पाटील, ह.भ.प.बाळकृष्ण महाराज वाकोडे, तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश आमले, अक्षय बुजबुले,प्रतिक पाथ्रिकर,चेतन पिंपळकार, सचिन गोरे,अक्षय अस्वार,शाम मोहे,गोपाळ खडसान,सागर गोरे,प्रज्वल लव्हाळे,आदेश महाले,प्रज्वल मोहोळ,राजेश गणगे,पिंटु अंजनकार,आशु पुरी,राम सुईवाल,सौरभ पाथ्रिकर, नितीन भातुरकर, संतोष झुंझळकार,अक्षय इंगळे यांनी परिश्रम घेतले.