Uncategorized

डिजिटल मीडिया परिषदेच राज्यव्यापी अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे. पत्रकार बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे – प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे

पत्रकार बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे - प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे

डिजिटल मीडिया परिषदेच राज्यव्यापी अधिवेशन छत्रपती संभाजीनगर येथे.
पत्रकार बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे – प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे

मुंबई – १४ सप्टेंबर २०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांच्या अध्यक्षतेखाली होत असुन या राज्यव्यापी अधिवेशनासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांच्या आदेशानुसार राज्यातील सर्व ३६ जिल्ह्यात डिजिटल मिडिया परिषदेचे जाळे निर्माण करण्याचं काम आम्ही घेतलं आहे. राज्यातील जवळपास 30 जिल्ह्यात जिल्हास्तरीय कार्यकारिणीच्या निवडी जाहीर केल्या गेल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांत सुध्दा डिजिटल मिडिया परिषदेच्या जिल्हा पदाधिकारी निवडी संदर्भात यंत्रणा उभी केली गेली आहे. महत्वाचे म्हणजे या राज्यव्यापी अधिवेशनात परिषदेशी जोडल्या गेलेल्या या पत्रकारांना एकत्र करून डिजिटल माध्यमांची तांत्रिक माहिती देणे, तसेच परस्पर सुसंवाद, येणाऱ्या अडचणी यांची चर्चा करणे हा या अधिवेशनाचा उद्देश असल्याच्या सुचना परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख सर यांनी दिल्या आहेत.14 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजता एकनाथ रंगमंदिर क्रांती चौक येथे मान्यवरांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होणार असून डिजिटल मिडिया विश्वातील मान्यवरांची व्याख्यानं देखील आयोजित केली आहेत. तसेच उत्कृष्ट युट्यूब आणि पोर्टल चालविणाऱ्या दहा संपादकांचा अधिवेशनात सन्मान करण्यात येणार आहे. सबस्क्राईबर्स, व्ह्यूवर्सची संख्या, तांत्रिक बाजू, बातम्यांची निवड आणि लोकांचे प्रश्न उत्तम पध्दतीनं मांडणा-या संपादकांची निवड करून त्यांचा गौरव केला जाईल.
डिजिटल मिडिया परिषदेची अद्याप राज्य कार्यकारिणी झालेली नाही.अधिवेशनात राज्य कार्यकारिणी सुध्दा निवडली जाणार असल्याचे एस.एम.देशमुख सर यांनी आदेशीत केले आहे. डिजिटल मिडियाला सरकारने जाहिराती देण्याचा निर्णय घेतला असला तरी या जीआर मध्ये युट्यूब चँनल्स तसेच न्यूज पोर्टलचा उल्लेख केला गेला नाही. ही बाब मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून देत त्यांना जाहिराती मिळाव्यात असा प्रयत्न केला जाणार असल्याचे तसेच डिजिटल पत्रकारांना अधिस्वीकृती मिळावी यासाठी देखील सरकारकडे पाठपुरावा केला जाणार असून अधिवेशनात तसे ठराव मांडले जाणार आहेत.
प्रिन्ट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियाचे अनेक प्रश्न अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेने मार्गी लावले आहेत.त्याच प्रमाणे डिजिटल मिडियाला भेडसावणारे प्रश्न हाती घेऊन डिजिटल मिडिया परिषद त्यांचा पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्य पदाधिकारी तसेच जिल्हाध्यक्ष व तालुका अध्यक्ष यांनी सुध्दा आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील सर्वांसोबत संपर्क साधावा व सर्वांना सोबत घेऊन
जिल्हास्तरीय कार्यकारिणी, तालुका स्तरावर असलेल्या कार्यकारिणी मधील पदाधिकारी व सदस्यांनी या महत्वपूर्ण असलेल्या राज्यव्यापी अधिवेशनात सहभागी व्हावे असे आवाहन देखील डिजिटल मिडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!