सतत लोकांमध्ये राहून काम करणे, सामाजिक कार्यात आपला सहभाग देणे या सोबतच पुस्तकांशी सुद्धा मैत्री त्यांना आवडत असते अश्या मोजक्या व्यक्तीं म्हणजे अकोल्याचे राम मुळे.
मराठा महासंघ, मराठा सेवा संघ मध्ये सुद्धा मोठे सामाजिक कार्य.
सतत लोकांमध्ये राहून काम करणे, सामाजिक कार्यात आपला सहभाग देणे या सोबतच पुस्तकांशी सुद्धा मैत्री त्यांना आवडत असते अश्या मोजक्या व्यक्तीं म्हणजे अकोल्याचे राम मुळे.
मराठा महासंघ, मराठा सेवा संघ मध्ये सुद्धा मोठे सामाजिक कार्य.

सार्वजनिक कार्यात सहभागी होणाऱ्या व्यक्तींना वाचनाची गोडी असेलच असे नसते. सतत लोकांमध्ये राहून लोकांचे चेहरे वाचणे, त्यांच्या अडीअडचणी समजून घेण्याचा वेगळा छंद अश्या लोकांना लागलेला असतो. काही व्यक्ती मात्र याला अपवाद असतात. सतत लोकांमध्ये राहून करणे, सामाजिक कार्यात आपला सहभाग देणे या सोबतच पुस्तकांशी सुद्धा मैत्री त्यांना आवडत असते अश्या मोजक्या व्यक्तींमध्ये अकोल्याचे राम मुळे यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. मराठा महासंघ, मराठा सेवा संघ असो की समाजाचा कोणताही उपक्रम असो त्यात रामभाऊ यांचा सक्रिय सहभाग नाही असे कधी घडत नाही. समाजाच्या अडचणीला धावून जाणे हे काम अनेक कार्यकर्ते करीत असतात मात्र जे त्यासाठी पाठपुरावा करतात त्यात राम मुळे यांचे नाव प्राधान्याने घेतले जाते. त्याच लोकमित्र बनलेल्या व्यक्तीला आताच राज्य सरकारचा ग्रंथमित्र पुरस्कार जाहीर झाला आहे, हा त्यांच्या सोबतच अकोल्याचा आणि सामाजिक कार्याचा सुद्धा सन्मान समजायला हवा. त्यासाठी रामभाऊ मुळे नक्कीच अभिनंदनास पात्र आहेत. अलीकडे पुस्तकांकडे वाचकांचा कल कमी झाला आहे, जी काही वाचनालये सध्या शहरात किंवा ग्रामीण भागात शिल्लक आहेत,

त्यांच्यात वाचकांची मोठी उणीव भासत असताना रामभाऊ मुळे यांनी वाचकांची पाऊले वाचनालया कडे कशी वळतील यासाठी गेली दहा वर्ष सतत प्रयत्न सुरु केले, त्याला हा पुरस्कार म्हणजे मोठे फळ असल्याचे समजले जाते. रामभाऊ गेली अनेक दशके ज्या पिढीसोबत सामाजिक कार्य करण्यात मग्न आहेत, त्या पिढीने आपण करीत असलेल्या कामाबद्दल कुणी पुरस्कार द्यावा अशी अपेक्षा कधीच केली नाही, मात्र अमरावती विभागीय ग्रंथमित्र या पुरस्कारासाठी त्यांची शासनाने निवड करून एका ध्येयाने काम करीत राहणाऱ्या लोकांनी कधी निराश होऊ नये असा संदेश देण्याचे काम केले आहे. कामात सचोटी, हृदयात प्रामाणिकता आणि लोक कल्याणाचा ध्यास असला की कुणीतरी दखल घेणाऱ्या यंत्रणा मदतीला येऊन हुरूप वाढवून जातात हेच रामभाऊ यांच्या कार्यातून दिसून येते.