जीव गेला तरी चालेल परंतु शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाल्याशिवाय थांबणार नाही – माजी राज्यमंत्री बच्चू कडू. तेल्हारा तालुक्यातील माळेगाव येथील जाहीर सभा.
जीव गेला तरी चालेल परंतु शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाल्याशिवाय थांबणार नाही - माजी राज्यमंत्री बच्चू कडू. तेल्हारा तालुक्यातील माळेगाव येथील जाहीर सभा.
जीव गेला तरी चालेल परंतु शेतकऱ्याची कर्जमुक्ती झाल्याशिवाय थांबणार नाही – माजी राज्यमंत्री बच्चू कडू.
तेल्हारा तालुक्यातील माळेगाव येथील जाहीर सभा.

शेतकरी,शेतमजूर हक्क यात्रेच्या माध्यमातून अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे प्रहारचे संस्थापक शेतकरी नेते बच्चुभाऊ कडू यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना बच्चुभाऊ कडू यांनी सरकार वर कडाडून टिका करत जबर प्रहार केले, जर येणाऱ्या महिनाभरात सोयाबीनला हमीभाव आणि सोयाबीन खरेदी केंद्र सुरू केलं नाही तर आम्ही सरकार ला स्वस्त बसू देणार नाही. शेतीमाल भावाची लढाई आहे, कष्ट आणि इमानदारीची लढाई आहे, जेवढं पिकतं त्याला भाव देता येत नसेल तर सरकारमध्ये का बसलाय तुम्ही? त्यापेक्षा बांगड्या भरा असं म्हणत बच्चूभाऊंनी महायुती सरकारवर प्रहार केला.
या सभेत बोलताना बच्चूभाऊंनी शेतकऱ्यांना एकजूट दाखवण्याचे आवाहन केलं, शेतकरी कर्जमाफी आणि पिकाला योग्य हमीभाव या मागणीसाठी मोठ्या संख्येने आपल्याला २८ ऑक्टोबरला नागपूरला जायचं आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत नागपूरवरून उठणार नाही. मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र बंद करू असा इशारा बच्चूभाऊ कडू यांनी राज्य सरकारला दिला.

या वेळी प्रहार पक्षाचे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ,
अकोला व बुलढाणा संपर्कप्रमुख नितीन आगे,
प्रहार अकोला जिल्हाध्यक्ष कुलदीप वसू व अकोला जिल्हा महासचिव राजेश पाटील खारोडे सुशील फुंडकर, ज्ञानेश्वर आखरे, गजानन पाटील वाघोडे, भैया देशमुख, सुरज भैय्या खारोडे,प्रहार अपंग क्रांतीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदीप ताथोड सह अन्य मान्यवर उपस्थित होते.

माळेगाव बाजार येथे बच्चू भाऊ यांचे जंगी स्वागत करण्यात आले. साज केलेल्या बैलगाडी मधून बच्चुभाऊ ची मिरवणूक काढण्यात आली यावेळी त्यांचेवर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करण्यात आली. प्रहार माळेगाव बाजार चे ज्ञानेश्वर आखरे यांनी आपल्या सहकारी यांचे सहयोगाने केलेल्या भव्य कार्यक्रमाचे कौतुक करण्यात आले.