तेल्हारा शहरातील जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक येथे वाहतुक नियंत्रण पोलीस चौकीची मागणी.
शांतता समिती तेल्हारा चे निवेदन.
तेल्हारा शहरातील जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक येथे वाहतुक नियंत्रण पोलीस चौकीची मागणी.
शांतता समिती तेल्हारा चे निवेदन.
तेल्हारा – दि.
तेल्हारा शहरातील मुख्य मार्गावर असलेले जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक येथे शहर वाहतूक नियंत्रक पोलीस चौकी उभारण्यात यावी या मागणीचे निवेदन शांतता समिती तेल्हारा यांच्या वतीने ठाणेदार पोलीस स्टेशन तेल्हारा यांना देण्यात आले आहे.

तेल्हारा शहरातील जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक हा परिसर तेल्हारा शहरातील मुख्य रहदारीचा मार्ग असुन याच परिसरात शहरातील मुख्य प्राथमिक शाळा ,कॉलेज , महाविद्यालय आहेत . याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. शहरातून तहसील कार्यालय,कोर्ट, भूमि अभिलेख,पंचायत समिती, तालुका कृषी कार्यालय,विज वितरण कार्यालय,विविध बॅक या ठिकाणी जाण्याचा मुख्य मार्ग आहे.तसेच वरवट,जळगाव जामोद,माळेगाव,दानापूर साठीच्या एसटी बस याच चौकातून जातात परिणामी वाहतूक कोंडी होवून याठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शहरातील वाहतुक व रहदारी या मार्गाने असल्याने जगतगुरु संत तुकाराम महाराज चौक येथे वाहतुक नियंत्रण पोलिस चौकीची उभारण्याची नितांत आवश्यकता आहे. हि बाब जनतेच्या वतीने शांतता समिती तेल्हारा चे पदाधिकारी यांनी ठाणेदार तेल्हारा उलेमाले यांना निवेदन देऊन वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून पोलीस चौकी करावी अशी मागणी केली आहे. यावेळी सर्व शांतता समिती सदस्य उपस्थित होते.