संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा.
विठ्ठल मंदीर तेल्हारा येथे संपन्न.

नाचु कीर्तनाचे रंगी,ज्ञानदीप लावू जगी या अभंगाचे रचियता मराठी, हिंदी मध्ये सातत्याने संत रचना करणारे,विठ्ठलाचे निस्सीम भक्त,महाराष्ट्रातील आद्य कवी संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा तेल्हारा येथील विठ्ठल मंदिरात आनंदात पार पडला.
सर्व प्रथम संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन माहेश्वरी शिंपी समाजातील ज्येष्ठ विश्वनाथ बोदळे, भगवान खापरे, हरिश्चंद्र बाभूळकर ,संजय बाभुळकर या मान्यवरांच्या हस्ते झाले तर महिला भगिनी मधुन सौ.रीणाताई बाभूळकर, सौ लताताई वडतकर,सौ सुचिता खंडाळकर यांच्या हस्ते संत नामदेव महाराज यांच्या प्रतिमेचे हारार्पण करून मनोभावे पुजन करण्यात आले. संत नामदेव महाराज यांच्या जीवन चरित्रावर डॉ महेशसेठ मुरकर यांनी प्रकाश टाकला तर महेश खंडाळकर यांनी श्री नामदेव महाराजांची विठ्ठल भक्ती मांडली. महिलांनी समाजाच्या सर्वांगीन विकासासाठी सदैव तत्पर राहण्याचे आवाहन अश्विनी बाभुळकर यांनी केले.
नागपूर येथे दि. १८/१९/२०२०२६ मध्ये अखिल भारतीय सर्व शाखीय शिंपी समाजाच्या भव्यदिव्य मेळाव्यात महिला व पुरुषांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन महेश खंडाळकर यांनी केले.
महाआरती नंतर अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल बोदळे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ .महेशकुमार मुरकर यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी संजय खापरे, गजानन बाभुळकर ,बंडुभाऊ मालठानकर, प्रमोद वडतकर सर,बंडुभाऊ सातपुते ,संजय खापरे ,सचिन खापरे, संजय बाभुळकर, मंगेश बोरसे, निशांत बावस्कर, गणेश बाभुळकर, अक्षय खापरे सोबतच सुनिता बाभुळकर, दर्शना खापरे गंगाताई बाभुळकर ,वच्छला बाभुळकर, प्रिती बावस्कर, ललीताताई मुरकर या महिला मंडळीं इत्यादीनी अथक परिश्रम घेतले.