नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांना अनुदान (सबसिडी) मिळावी.
खा. अनुप धोत्रे यांची संसदेत मागणी.
नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांना अनुदान (सबसिडी) मिळावी.
खा. अनुप धोत्रे यांची संसदेत मागणी.

संसद भवन नवी दिल्ली -दि.
नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांना अनुदान (सबसिडी) देण्याची मागणी अकोला खासदार अनुप धोत्रे यांनी आज संसदेत सरकारकडे केली.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला बळकट करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.आजची शेतीची परिस्थिती पाहता नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांना प्रोत्साहन देणे आवश्यक आहे.भारताचे कृषी क्षेत्र हे देशाच्या GDP मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देते,
नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी ही पर्यावरणपूरक, पोषणक्षम खते आहेत. यांच्या वापरामुळे अत्याधिक रासायनिक वापर कमी होतो, मातीचे प्रदूषण रोखता येते,ही खते पर्यावरणीय हानी कमी करत पिकांचे उत्पादन वाढवतात. नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीला अनुदान दिल्यास शेतकऱ्यांना हवामान आधारित संवेदनशील शेती पद्धती स्वीकारण्यास प्रोत्साहन मिळेल.त्याच अनुषंगाने सरकारकडे नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी खतांना अनुदान देण्याची मागणी आज खासदार अनुप धोत्रे यांनी संसदेत केली आहे.