संतद्वय पालखी सोहळ्याचे पंढरीक्षेत्रात आगमन.
वैदर्भीय वारकरी सदभक्तांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन आनंद घेण्याचे आवाहन पालखी सोहळा व्यवस्थापन समितीने केले.
संतद्वय पालखी सोहळ्याचे पंढरीक्षेत्रात आगमन.
वैदर्भीय वारकरी सदभक्तांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन आनंद घेण्याचे आवाहन पालखी सोहळा व्यवस्थापन समितीने केले.

गात जागा गात जागा l प्रेम माझा विठ्ठला ll या तुकोक्तीनुसार दोन्हीकडचा प्रवास पायी करणाऱ्या बोटावर मोजण्या एवढ्या पालखी सोहळ्यांपैकी गत पंचावन्न वर्षापासून आपली परंपरा कोरोना महामारीच्या काळात सुद्धा अक्षुन्न ठेवणाऱ्या योगी सम्राट गजानन महाराज यांचे अंतरंग प्राणप्रिय पट्ट शिष्य श्री संत भास्कर महाराज आणि त्यांचे पौत्र श्री संत वासुदेवजी महाराज या संतत्वयांचा उभयतांचे जन्मस्थान असणाऱ्या श्री क्षेत्र अकोली जहागीर येथून निघालेल्या राजवैभवी संतद्वय पालखी सोहळ्याचे श्रीक्षेत्र पंढरपूर येथे मोठ्या उत्साहात आगमन होऊन , श्री पुंडलिक घाट पूर्व महाद्वार स्थित श्रीमंत अहिल्यादेवी होळकर वाड्यामध्ये स्थिरावला.
श्री संत भास्कर महाराज संस्थान आडगाव बुद्रुक चे विलीनीकरण श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव मध्ये संत श्री वासुदेवजी महाराज यांच्या इच्छे नुसार झाल्यानंतर बंद पडू पाहणाऱ्या संस्थानच्या नव्हे तर, परंपरागत पिढीजात चालत आलेल्या पवित्रतम् जायले कुळातील पंढरीच्या वारी परंपरेचे श्री संत वासुदेवजी महाराजांनी त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यात्याच्या कालखंडात श्रींचे कुलोत्पांन्न व विद्यावंशाचा सुद्धा वारसा समर्थपणे सांभाळणारे श्रीयुत अशोक महाराज जायले यांच्याकडे अधिकृतरित्या हस्तांतरित करून , पालखी सोहळ्याची मानाची विना साश्रृनयनांनी स्वतःच्या हाताने त्यांच्या निवासस्थानी अकोट येथे
प्रदान करून समस्थ गुरुबंधू व असंख्या वारकऱ्यांच्या समक्ष सोहळ्याचे नेतृत्व करण्याची २००२ साली अधिकृतरित्याआज्ञा केली. तसेच देहत्यागापूर्वी २००९ साली पालखी सोहळा तथा जायले कुळाचा संपूर्ण इतिहास सांगून निवासस्थानी उपस्थित असणाऱ्या संपूर्ण भाविक सदभक्तांसमक्ष श्रीयुत अशोक महाराज जायले त्यांना आजपासून भगीरथ महाराज म्हणत जावे कारण पुराणोक्त भगीरथानी पूर्वजांच्या उद्धाराकरिता स्वर्गस्थ गंगा मातेला मृत्युलोकात आणले आणि यांनी पूर्वजांची पूर्वापार चालत आलेली परंपरा चिरंतन करण्याकरिता अनेक संकटांवर मात करून हा सोहळा चालू ठेवला व चालू ठेवतील यावर माझा पूर्ण विश्वास आहे . असे म्हणून अशोक महाराजांचे हात त्यांच्या चरणावर ठेवून , स्वेच्छेने स्वतःचा वरदहस्त निवासस्थानावरील संपूर्ण मंडळींच्या समक्ष त्यांच्या मस्तकावर ठेवला . तसेच पालखी सोहळा श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहोचताच माता चंद्रभागा देवीच्या पुण्यतिथी निमित्ताने वाटेत वारकऱ्यांच्या व्यवस्थेकरिता लागणारा आशीर्वादात्मक निधी सुद्धा प्रकृतीअस्वस्थ असतांना सुद्धा सालाबाद प्रमाणे न चुकता त्यांना सुपूर्त केला. विशेष म्हणजे आपल्या जीवनाचा अमूल्य ठेवा म्हणून तो गंगाजळी स्वरूप निधी अशोक महाराज यांनी अजून पर्यंत जपून ठेवला आहे. तेव्हापासून आजतागायत ते निष्काम भावनेने त्यांच्या संपूर्ण कुटुंबासहित तीन पिढ्यांसह त्यांचे गुरुबंधू भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ , नागोराव महाराज चौखंडे , शरद महाराज खंडारे, प्रकाश महाराज नेव्हारे , ज्ञानेश्वर महाराज भालतिलक , निलेश महाराज जाणे , सोपान महाराज लोखंडे , शिवा महाराज रेचे , अवधूत महाराज थोरवे , अविनाश महाराज कडु, विठ्ठल महाराज केंद्रे,सुदाम महाराज आगरकर विणेकरी श्री मोहन महाराज रेडे आदि अनेकानेक महाराज मंडळींच्या सहकार्याने हा सोहळा अव्याहत सुरळीतपणे चालवीत आहेत .
विशेष म्हणजे या पालखी सोहळ्यामध्ये चालणारे वारकरी व अन्नदाते सुद्धा वंश परंपरागत आपली सेवा गेल्या अनेक वर्षापासून रुजू करीत आहेत.
सालाबाद प्रमाणे याही वर्षी दि. ३ ते १० जुलै पर्यंत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन तथा काकडा हरिपाठसह हरिकीर्तन सप्ताहाचे तसेच आषाढ शुद्ध दशमीला श्री संत पुंडलिक महाराज तसेच आषाढ शुद्ध एकादशीला श्री संत वासुदेवजी महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . तरी उपरोक्त सर्वच कार्यक्रमाचा वैदर्भीय वारकरी सदभक्तांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन आनंद घेण्याचे आवाहन पालखी सोहळा व्यवस्थापन समितीने केली आहे.