आपला जिल्हा

सहकार ते समृद्धी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षी दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँक लि अकोला यांनी 116 वर्षे अविरत सेवा दिली या माध्यमातून ग्राहकासाठी विविध योजना उपलब्ध केल्या त्या सेवेचा युवकांनी आर्थिक सक्षम बनण्यासाठी लाभ घ्यावा व आर्थिक बाजू संक्षमतेकडे लक्ष द्यावे – डॉ. जयराज कोरपे

तेल्हारा पगारदार सहकारी पतसंस्था व बिगरशेती संस्थेची प्रशिक्षण कार्यशाळा.

सहकार ते समृद्धी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षी दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँक लि अकोला यांनी 116 वर्षे अविरत सेवा दिली या माध्यमातून ग्राहकासाठी विविध योजना उपलब्ध केल्या त्या सेवेचा युवकांनी आर्थिक सक्षम बनण्यासाठी लाभ घ्यावा व आर्थिक बाजू संक्षमतेकडे लक्ष द्यावे – डॉ. जयराज कोरपे
तेल्हारा पगारदार सहकारी पतसंस्था व बिगरशेती संस्थेची प्रशिक्षण कार्यशाळा.

तेल्हारा पगारदार संस्थांना
आवश्यक आयकर तरतुदी व कायद्याला धरून असलेले हिशेबी ज्ञान कार्यशाळेच्या माध्यमातून देणे ही काळाची गरज आहे.सहकार ते समृद्धी आंतरराष्ट्रीय सहकार वर्षी दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती बँक लि अकोला यांनी 116 वर्षे अविरत सेवा दिली या माध्यमातून ग्राहकासाठी विविध योजना उपलब्ध केल्या त्या सेवेचा युवकांनी आर्थिक सक्षम बनण्यासाठी लाभ घ्यावा व आर्थिक बाजू संक्षमतेकडे लक्ष द्यावे, आर्थिक बाबींचे योग्य नियोजन करून आपली उन्नती करावी, असे प्रतिपादन बँकेचे संचालक डॉ. जयराज कोरपे यांनी केले. ते आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त दि अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने तेल्हारा येथे पगारदार पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ३ जुलै रोजी बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले महाराष्ट्रात सहकाराची उज्ज्वल परंपरा असून अकोला-वाशिम जिल्हा मध्य. सहकारी बँक ही १९०९ मध्ये स्थापन झालेली देशातील पहिली जिल्हा बॅक आहे. या वटवृक्षाची जोपासना करण्यासाठी तरुणांनी सहकाराची कास धरावी, असे आवाहन देखील त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा तथा बँकेच्या संचालिका सौ. रुपालीताई संदिप खारोडे, उद्घाटक कृउबासचे माजी सभापती व विद्यमान संचालक संदीप खारोडे, प्रमुख अतिथी म्हणून बँकेचे संचालक डॉ. जयराज कोरपे,सहाय्यक निबंधक सहकारी संस्था देवेंद्र शेगोकार, माजी प्राचार्य अण्णासाहेब ढोले,ॲड गजानन तराळे, बँकेचे विशेष कार्याधिकारी प्रशांत उकंडे उपस्थित होते. कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून कर्ज व देखरेख विभागाचे सहा. व्यवस्थापक बी. टी. पारधी, सनदी लेखापाल सुवर्णा मंगळे यांनी उपस्थितांना सविस्तर प्रक्षीक्षणपर मार्गदर्शन केले. यावेळी बँकेच्या संचालिका रुपाली खारोडे व सहाय्यक निबंधक देवेंद्र शेगोकार यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

संचालक डॉ. जयराज कोरपे यांचा तेल्हाऱ्यातील विविध संस्था, संघटना पदाधिकारी, सदस्य यांनी सत्कार केला. प्रास्ताविक बँकेचे मुख्याधिकारी जी. एच. शिंदे, संचलन मार्केटिंग ऑफिसर एस. के. गाडगे तर आभार तेल्हारा पालक शाखाधिकारी अजय धोत्रे यांनी केले. कार्यक्रमास तालुक्यातील पगारदार कर्मचारी सहकारी पतसंस्थेतील पदाधिकारी, सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते.

सहकारी चळवळ
जवळपास दहा-बारा वर्ष जागतिक आर्थिक मंदीचा काळ होता त्या काळात देखील या सेवा सोसायटीच्या माध्यमातून टिकून राहील्या जिल्हा मध्यवर्ती बँक चा हा जो तुम्हाला आम्हाला मोठा डोलारात दिसतो त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा या डोलाऱ्याची मूळ ह्या सोसायट्या आहेत त्या टिकल्या पाहिजेत या साठी जिल्हा बॅक सर्वतोपरी प्रयत्नरत आहे. कायद्याने घालून दिलेल्या नियमानुसार पुढे गेलो पाहिजे जे कायद्याने घालून दिलेले नवनवीन बदल आहेत ते स्विकारून इन्कम टॅक्स सुविधा,पीडीएफ संदर्भात सुविधा हे सर्व नवीन कायद्यानुरूप कायद्याच्या कक्षेत राहून आत्मसात केले पाहिजे तरच आपल्या संस्था टिकतील. माणसं येतात माणसं जातात परंतु त्यांनी केलेल्या सुनियोजित कामामुळे संस्था ह्या कायम राहतात, टिकतात याची आमच्याकडे खूप सारी उदाहरणे चांगले आहेत त्यात ती शिवाजी शिक्षण संस्था उदाहरणार्थ सांगता येईल.
जिल्हा मध्यवर्ती बँक 2025- 26 ही जागतिक पातळीवर युनायटेड देशातही इंटरनेटवर आहे. या सहकार ते समृद्धी या वर्षभरामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी आपण स्वतः व इतरांना देखील आर्थिक साक्षरता कशी करता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित केलं पाहिजे. जे येथे शिक्षक म्हणून असतील त्यांना विशेष करून या आव्हान स्वीकारले पाहिजे विद्यार्थ्यांना शाळेमध्ये असतानाच बचतीचे धडे दिले पाहिजे, आर्थिक शिस्त काय असते ,आर्थिक साक्षरता काय असते ही सांगितले पाहिजे त्यामुळे विद्यार्थी वयापासूनच बचतीचे महत्त्व समजेल हाच खरा सहकार ते समृद्धी चा मार्ग आहे असेही प्रशिक्षणा दरम्यान सांगितले गेले.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!