आपला जिल्हा

तेल्हारा आगाराच्या त्या नवीन पाच लालपरिचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण.

प्रवासी संघ, सामाजिक संघटना, भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित. 

तेल्हारा आगाराच्या त्या नवीन पाच लालपरिचे आमदारांच्या हस्ते लोकार्पण.
प्रवासी संघ, सामाजिक संघटना, भाजपा कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित.

तेल्हारा तालुक्यातील रस्ते व एसटी बसेस यांचे दुखणे अवजळ जागेचे झाले होते याबाबत निवेदन, आंदोलन,मोर्चा, एसटी कामगाराचे आंदोलन,प्रवाशी संघ,सामाजीक संघटना,पक्ष, विविध वृत्तपत्र पाठ पुरावा सर्व व्यापकता पाहून स्थानिक आमदार प्रकाश भारसाकळे यांनी सर्वप्रथम ज्यामुळे एस टी बसेस खिळखिळ्या झाले ते रस्ते केले व तेल्हारा आगारात नवीन बसेस मिळाव्या यासाठी जनतेच्या सर्वव्यापी मागणीनुसार मुख्यमंत्र्यांना भेटून नवीन बसेसची मागणी व पाठपुरावा केला,परिणामी सर्वव्यापी मागणी व पाठपुरावा पाहून तेल्हारा आगारात पाच नवीन लालपरी मिळाल्या असल्याचे दिसून आले. याबाबत सोशल मीडियावर नवीन लालपरी संदर्भात श्रेय घेण्याच्या वावड्या उठल्यावर आज दि. 25 रोजी दुपारी 2 वाजता तेल्हारा आगारात आ. प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते पूजन करून नवीन लालपरी प्रवाशांच्या सेवेत सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेला थोडा दिलासा मिळाला आहे.

जनतेची सर्वाधिक मागणी पाहता आ. भारसाकळे यांनी मतदारसंघात दहा नवीन बसेसची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. सदर पत्रावर मुख्यमंत्री यांनी कारवाई करावी, असे महाराष्ट्र राज्य परिवहन महाव्यवस्थापक यांना कळवले असता पाच एस टी बस अकोट आगारात तर पाच तेल्हारा श आगारात दाखल झाल्या. त्या पाच नवीन लालपरिचे आ. प्रकाश भारसाकळे यांच्या हस्ते पूजन करून लोकार्पण करण्यात आले.
यावेळी आयोजित कार्यक्रमाला मंचावर आमदार प्रकाश भारसाकळे, तेल्हारा आगार प्रमुख मिथुन शर्मा, माजी नगराध्यक्षा सौ. जयश्री पुंडकर प्रतिभा बरिंग, कल्पना पोहने,आरती गायकवाड, मोनिका वाघ, माजी तालुका अध्यक्ष गजानन उंबरकार, तालुका अध्यक्ष गणेश रोठे, शहर अध्यक्ष ओमु सुईवाल,टोलूसेठ गोयनका, यांच्या सह केशवराव ताथोड, माजी नगराध्यक्ष अनिल पोहणे, जेष्ठ नेते अशोक गोयनका भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, तेल्हारा आगारातील सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक नितीन महल्ले, वाहतूक निरीक्षक राजेश खंडेराव, आगार लेखाकार योगेश पांडे, वरिष्ठ लिपिक वैभव ठाकरे, लिपिक पुरुषोत्तम राखोंडे, प्रशासन कर्मचारी रवींद्र सोळंके, विजय गवई, सुरज राठोड, गणेश इंगळे, राजीव खराटे, शशांक मगर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी जे बस चालक व वाहक एस टी आणण्यासाठी गेले होते ते नंदकिशोर जायले, संजय काळोणे, एस बी नेमाडे, गजानन गव्हाणकर, एल आर राणे, श्याम मोडक, शशांक मगर, दीपक राऊत, सागर तळोकार, युवराज बोरे इत्यादी कर्मचाऱ्यांनी नवीन एसटी बसेस ताब्यात घेऊन सतत प्रवास करून तेल्हारा आगारात आणल्या त्यांचा आमदार यांनी सत्कार केला. तसेच आर्य समाज तेल्हारा चे संदीप शेगोकार यांनी सुद्धा सत्कार केला.

यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. तेल्हारा आगारात पंढरपूरच्या यात्रेपूर्वी नवीन बसेस दाखल झाल्याने वारकऱ्यांमध्ये तसेच प्रवाशांमध्ये समाधान दिसून आले असले तरी एसटी बस ची संख्या पाहता अजून अतिरिक्त बसची मागणी या निमित्ताने होत आहे. आयोजित कार्यक्रमाचे प्रास्ताविक आगार व्यवस्थापक मिथुन शर्मा यांनी केले. संचालन मोनिका वाघ यांनी केले तर बस आगाराच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

यावेळी उपस्थित प्रवाशी संघाचे डॉ. ओ. आर. चौधरी,आनंद राठी, दादासाहेब पाटील पाथ्रीकर,जनार्दन चतारे,डाॅ.गो.खे.महाविद्यालय प्राचार्य डॉ. गोपाल ढोले,भाजपाचे अमृता पाटील,दिपक पोहणे, डॉ चोपडे, रवी गाडोदिया, विजय देशमुख, सतिश जयस्वाल,माजी नगरसेवक सुनील राठोड,अनुप पाटील मार्के, मंगेश सोळंके,मुकेश आसरे,ज्ञानेश्वर सरप,राजू पाटील कुकडे,सुदेश शेळके, शामल देशमुख, बरिंगे सर,भाऊसाहेब तिव्हाणे,योगेश भारूका,रुपेश राठी, गणेश इंगोले, शिवा खाडे, अंकुश सपकाळ, रुपेश चव्हाण, मोहन चंदन,सतिश चहाजगुणे, रामेश्वर हागे,आकाश फाटकर,योगेश बिडवे, मयुर चहाजगुणे, पाचपोर टेलर,भागवत,डॉ जयस्वाल, सुनील भुजबले, पप्पू वानखडे,पत्रकार संघाचे सुरेश शिंगणारे, अनंतराव अहेरकर, सत्यशील सावरकर,अनिल अवताडे, संदीप सोळंके, सेवकराम हेरोळे, तेल्हारा पोलीस स्टेशन चे ठाकरे साहेब, राजु इंगळे, बान्हेरकर,गिरी साहेब इत्यादी सह सामाजिक कार्यकर्ते,भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रवासी यांची उपस्थिती होती.

नवीन लालसर मधील सुविधा –
तेल्हारा आगाराला मिळालेल्या नवीन लालपरी मध्ये असलेल्या सुविधामध्ये पुश बॅक सीट,प्रत्येक सीटजवळ युएसबी चार्जिंग क्लब, प्रवेश व्दार, आरामदायी सीटरचना, चालक सिट रचना ,एसटीच्या अंतर्गत सुविधांमध्ये टूल बाॅक्स, प्रवाशी लगेज कक्ष, बॅटरी कक्ष, राखीव टायर इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!