वान अभयारण्यात वन औषधी प्रक्रिया केद्राची मागणी.
पत्रकार सत्यशील सावरकर यांचे निवेदन.

तेल्हारा – दि.
सातपुडा पर्वतरांगा मधील विविध वन औषधी पाहता वान अभयारण्यात वन औषधी वनस्पती व त्यावरील प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याची मागणी जनतेच्या वतीने पत्रकार सत्यशील सावरकर यांनी निवेदनाद्वारे खासदार अनुप धोत्रे, मतदारसंघ आमदार प्रकाश भारसाकडे यांचे कडे केली आहे.
अकोला जिल्ह्यातील युवा अभ्यासू खासदार अनुप धोत्रे यांनी आयुष मंत्री यांना केलेल्या वन औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग विषयावर सविस्तर अभ्यासपूर्ण माहीती सभागृहात मांडली त्यानुसार तेल्हारा तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या भागात वन औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग झाल्यास या भागात रोजगाराची संधी उपलब्ध होवून परिसरातील जनतेला फायद्याचे होईल.
तेल्हारा तालुक्यातील वान अभयारण्य बुलढाणा, अमरावती, मध्यप्रदेश राज्यातील भागाला लागलेल्या सातपुडा पर्वत रांगा मधील भाग आहे. या भागात विविध प्रकारच्या वन औषधी वनस्पती, वेली, झाड, झुडपे आढळतात. वान भाग अकोला बुलढाणा अमरावती या तिन जिल्ह्यातील सोयीचे ठिकाण असून वारी येथे मोठा वाव आहे. हनुमान सागर धरण व हनुमंत रायाचे भक्तांचे श्रद्धास्थान असलेले भव्य अशी मुर्ती असलेले पुरातन मंदीर पर्यटनस्थळ आहे.बारमाही धरण साठा असल्याने भागात वन औषधी वनस्पती भरपूर आहेत.

सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या भागात विविध वन औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आहेत. या भागातील वन वैभव पाहता या ठिकाणी एखादा वन औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग उभारणी करावी अशी मागणी जनतेच्या वतीने करित आहोत. जनहिताच्या मागणी चा विचार व्हावा अशी मागणी तेल्हारा तालुक्यातील पत्रकार तथा बेलखेड चे माजी उपसरपंच सत्यशील प्रभाकरराव सावरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.