आपला जिल्हा

पंजाब डख यांचे मार्गदर्शन व भव्य शेतकरी मेळावा.

31 मे रोजी हिवरखेड येथे.

पंजाब डख यांचे मार्गदर्शन व भव्य शेतकरी मेळावा.
31 मे रोजी हिवरखेड येथे.

शनिवार दि. 31 मे रोजी संध्याकाळी ठीक 6.00 वा. कस्तुरबा गांधी विद्यालय हिवरखेड येथे हिवरखेडचे माजी उपसरपंच रमेश दुतोंडे व माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. सुलभाताई दुतोंडे यांनी भव्य शेतकरी मेळावा आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला आहे.
या मेळाव्यात प्रसिद्ध हवामान तज्ञ पंजाब डख हे मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच भरत चव्हाण कृषी अधिकारी पंचायत समिती तेल्हारा, गौरव राऊत मंडळ कृषी अधिकारी हिवरखेड हे सुद्धा शासनाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजना व विमा योजनाबद्दल माहिती देणार आहेत.
आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणाऱ्या या शेतकरी मेळाव्याचे उदघाटक माजी सरपंच मिलिंदकुमार भोपळे असणार आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गावंडे, तेल्हारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल इंगळे,ख. वि. संघ तेल्हाराचे माजी सभापती अनिल कराळे, माजी पंचायत समिती सदस्य मनिष भांबुरकर, सेवा सहकारी सोसायटी हिवरखेडचे सभापती ज्ञानदेवराव मोरोकार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या मेळाव्यात हिवरखेड व परिसरातील भरघोस उत्पन्न घेणाऱ्या काही निवडक शेतकऱ्यांचा सत्कार सुद्धा होणार आहे. तरी या मेळाव्याला शेतकरी बांधवानी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन संयोजक महेंद्र कराळे, प्रविण येऊल व किरण सेदानी यांनी केले आहे.

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!