श्री अंबिकादेवी विद्यालय सौंदळा.
दोन विद्यार्थी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड.

सौन्दळा येथील श्री अंबिकादेवी विद्यालयाच्या कु. आराध्या मंगेश खारोडे व अथर्व मंगेश पुंडकर या दोन विध्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली असून त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. या अगोदर सुद्धा या विद्यालयाच्या अनेक विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे अथर्व मंगेश पुंडकर याचा भाऊ आदित्य मंगेश पुंडकर याची सुद्धा मागच्या वर्षी जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे. ग्रामीण भागातील अतिशय गरीब शेतकऱ्यांचे हे हुशार विध्यार्थी आपल्या कुटुंबासोबत शाळेचा सुद्धा नावलौकिक वाढवत आहे.
या विध्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष शंकरराव पुंडकर गुरुजी, प्राचार्य ठाकरे सर यांनी या गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांचे शिक्षक तराळे सर, चांदुरकर सर, कोल्हे सर यांचे अभिनंदन केले असून या विध्यार्थ्यांचा शाळेतील शिक्षक महेंद्र कराळे, विलास घुंगड, राजेश टाले, प्रा. मनिष गोरद, प्रा. पुरुषोत्तम गाढे, प्रा. रविंद्र ससाणे यांच्याहस्ते या विध्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.