नगरपरिषद च्या मार्फत तयार झालेल्या नवीन कॉम्प्लेक्स ला छत्रपती धर्मवीर संभाजी – महाराज यांच नाव देण्यात यावे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन सादर.
नगरपरिषद च्या मार्फत तयार झालेल्या नवीन कॉम्प्लेक्स ला छत्रपती धर्मवीर संभाजी – महाराज यांच नाव देण्यात यावे.
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन सादर.

तेल्हारा दि.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मार्केट जवळील पुर्णत्वास येत असलेल्या नगरपरिषदेच्या नवीन कॉम्प्लेक्स ला छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच नाव देण्यात यावे याकरिता शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद तेल्हारा यांना निवेदन सादर करण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज यांच स्वराज्याच्या रक्षणासाठी योगदान,त्यांचे कार्य,त्याग,बलिदान बघता त्यांचं नाव देण्यात यावे. शहरातील नगर पालिकेच्या कुठल्याही इमारतीवर तथा वास्तूवर छत्रपती संभाजी महाराज यांच नाव नाही. करिता या नवीन कॉम्प्लेक्स वर देण्यात यावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी तालुकाप्रमुख अजय पाटील गावंडे,शिवसेना शहरप्रमुख विवेक खारोडे,माजी शहरप्रमुख राजेश वानखडे,मा.युवासेना तालुकाप्रमुख निलेश धनभर,समन्वयक गजानन मोरखडे,सहसंघटक पप्पूसेठ सोनटक्के, प्रवक्ते सचिन थाटे,उपशहरप्रमुख मनीष गवळी,गोपाल जायले,गौतम दामोदर,माजी शहरप्रमुख अनिल तायडे,प्रफुल्ल बोदडे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.