मैदानी खेळ संघटन कौशल्य विकसित करतात – भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ. श्री संत वासुदेव जी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ केळीवेळी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन.
भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ.
मैदानी खेळ संघटन कौशल्य विकसित करतात – भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ.
श्री संत वासुदेव जी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ केळीवेळी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन.

कृष्णावतारात गोकुळ लीला करीत असतांना भगवान श्रीकृष्णाने अठरा पगड जातींच्या बालगोपाळांना एकत्रीत करून त्यांच्यासोबत नाना प्रकारचे मैदानी खेळ खेळून त्यांचे मन मेंदू व मनगट मजबूत करण्याचे काम केले. किंबहुना या कमजोर व अबोध बालकांना संघटित व सक्षम करून या संघटनेच्या माध्यमातूनच बलाढ्य असणारी कंसशाही पालथी घातली. एकूणच खेळ हे सांघिक कृत्य असल्याने संघटन मजबूत होते. मैदानी खेळ खेळणाऱ्या मध्ये संघटन कौशल्य विकसित होऊन तो नेतृत्व करायला लागतो असे अभ्यासपूर्ण मत भागवताचार्य ज्ञानेश्वर महाराज वाघ यांनी मांडले.
ते आज श्री संत वासुदेव जी महाराज स्मृति मंदिर श्री ज्ञानेश आश्रम वारी भैरवगढ येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी हनुमान क्रीडा प्रसारक व बहुउद्देशीय मंडळ केळीवेळी यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करीत असतांना बोलत होते. ते पुढे म्हणाले की मुलांनी खेळणे वाईट नाही फक्त ते अभ्यासाच्या वेळेत नसावी. अभ्यास व इतर कामे यांच्या माध्यमातून आलेला तान कमी करण्याचे खेळ ही एक प्रभावी साधन आहे. मैदानी खेळ हे विजय आणि हार याचा सामना करण्यास सक्षम बनवितात तसेच पराभव सुद्धा सानंद पचविण्याचे सामर्थ्य प्रदान करतात. एवढेच नाही तर त्यामुळेच एकाग्रता , जिद्द , विजय प्राप्ती करता लागणारी चिकाटी , बुद्धी कौशल्य , नियोजनबद्धता , पारख करणे आदि सद्गुण वाढीस लागतात. मैदानी खेळ हे बालकांच्या चंचलत्वाला चपळत्वात परिवर्तित करून त्याच्या मासपेशी मजबूत करून त्याचा उत्साह वाढवित शारीरिक विकासाकरिता कारणीभूत होतात. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हाराच्या उपसभापतीपदी अविरोध निवडून आलेले हरिदास पाटील वाघ तसेच भा. ज. पा. ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी निर्वाचित झालेले संतोष शिवरकर , माजी आमदार गजाननराव दाळू गुरुजी यांचा मंडळाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला तसेच यावेळी डॉ.राजकुमार बुले,किशोर बुले (ग्राम मंडळ अध्यक्ष),माधवराव बकाल, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गावंडे, डॉ.संजय शर्मा उपस्थित होते.असे भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.