रोखलेला पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करा..
उपमुख्यमंत्री यांना प्रशांत डिक्कर यांचे निवेदन..
रोखलेला पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करा..
उपमुख्यमंत्री यांना प्रशांत डिक्कर यांचे निवेदन..

तेल्हारा, दि. २४ जुलै २०२५: अकोला जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी फळबाग आणि रब्बी पिकांचा विमा काढला होता. मात्र, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून पिक विमा रक्कम अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. याबाबत स्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सावंत यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. या निवेदनात शेतकऱ्यांच्या हक्काची पिक विमा रक्कम तात्काळ त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी विमा कंपन्यांना निर्देश देण्याची मागणी डिक्कर यांनी केली आहे.स्वराज्य पक्षाने निवेदनात नमूद केले आहे की, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तरीही विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईच्या रकमेचे वितरण रखडले आहे. शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी विमा कंपन्यांनी त्वरित कार्यवाही करावी, यावेळी स्वराज्य पक्षाने शेतकऱ्यांच्या हितासाठी सातत्याने आवाज उठवत उपमुख्यमंत्र्यांनी या मागणीची दखल घेत योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचे समजते. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची रक्कम लवकरात लवकर मिळावी, यासाठी स्वराज्य पक्ष पाठपुरावा करणार असल्याचे प्रशांत डिक्कर यांनी सांगितले आहे.