Uncategorized

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचं 44 वं राष्ट्रीय अधिवेशन ऑगस्टमध्ये शेगावला

एस. एम. देशमुख यांची माहिती. 

अ. भा. मराठी पत्रकार परिषदेचं 44 वं
राष्ट्रीय अधिवेशन ऑगस्टमध्ये शेगावला. 

एस. एम. देशमुख यांची माहिती. 

शेगाव : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचं 44 वं राष्ट्रीय अधिवेशन ऑगस्ट 2025 च्या दुसरया आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यात संतनगरी शेगाव येथे होणार असल्याची घोषणा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आज येथे केली..
एस.एम देशमुख, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे आणि डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी आज शेगावला भेट देऊन बुलढाणा जिल्हा आणि शेगावच्या पत्रकारांची भेट घेऊन त्यांची मतं जाणून घेतली.. यावेळी जिल्ह्यातील पत्रकारांनी शेगाव येथे अधिवेशन होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करून अधिवेशन यशस्वी करण्याची ग्वाही दिली..
परिषदेचे अधिवेशन दर दोन वर्षांनी होते.. 2022 मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये अधिवेशन झाले होते.. त्यानंतर 2024 मध्ये हे अधिवेशन होणे अपेक्षित होते मात्र तेव्हा अधिवेशन झाले नाही.. आता हे अधिवेशन होत आहे.
बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ आणि शेगाव तालुका पत्रकार संघ हे अधिवेशनाचे आयोजक असणार आहेत..
देशातील मान्यवर पत्रकाराच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन होईल, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच अनेक मान्यवरांना अधिवेशनासाठी निमंत्रित करण्यात येणार आहे.. राज्यातील 3000 पत्रकार अधिवेशनास उपस्थित राहतील अशी अपेक्षा श्री.एस.एम.देशमुख यांनी केली.. अधिवेशनाचे नियोजन करण्याची जबाबदारी परिषदेच्यावतीने सुरेश नाईकवाडे, अनिल वाघमारे, अनिल उंबरकर,, चंद्रकांत बेरदे , रणजीत राजपूत यांच्यावर सोपविण्यात आली आहे..

admin

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!